file photo 
नांदेड

" आशादिप " या व्हॅटस्पअप ग्रुपने आणला अनाथ मुलीच्या जिवनात आशेचा किरण

बंडू माटाळकर

निवघा बाजार (जिल्हा नांदेड ) : जिवन जगतांना समाजाच काही देणं लागत या उद्दात हेतूने व समाजात अत्यंत हलाखीच्या परीस्थीतीमध्ये जीवन जगतात अशांना खारीचा वाटा म्हणून काही तरी मदत करावी या विचाराने प्रेरीत होऊन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हरीशचंद्र चिल्लोरे यांनी समविचारी तरुणांचा सोशल मिडीया व्हॉटसअप ग्रुप चार महीन्यापूर्वी बनवला. आणि प्रत्येक ग्रुप सदस्य यांनी दरमहा काही रक्कम जमा करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व जण दर महीन्याला कोणी दोनशे तर कोणी पाचशे रुपये जमा करत होते. दर महीन्याला तीन ते चार हजार रुपये रक्कम जमा होते. ती जमा झालेली रक्कम गरजवंताना देण्यात येते.

फेब्रुवारी आणि मार्च महीन्यात जमा झालेली रक्कम काळेश्वर (ता. हदगाव) येथील एका अनाथ मुलीच्या लग्नाकरीता लागणारे साहीत्य घेण्यासाठी देण्यात आली. काळेश्वर येथील रेणूका गोडबोले ही मुलगी सात महीण्याची असतांना काही तरी कारणावरुन तिच्या आई- वडिलांचा घटस्पोट झाला. नंतर तिच्या आईने दुसरे लग्न केले व तिला मामाकडे सांभाळ करायला ठेऊन गेली. ती आजपर्यंत मुलीला बघायलासुध्दा आली नाही. मामा आणि आजीने रेणूकाचा सांभाळ केला. मामा रोज मजुरी करतात. रेणूकाचे लग्न जुळले लग्नाचे साहीत्य घेण्याला पैसा नाही ही बाब पत्रकार देविदास कल्याणकर यानी आशादिप ग्रुपला कळवली. आणि रेणूकाच्या लग्नाकरीता लागणारे भांडी घेऊन देण्यात आली. 

लग्ना करीता मदत मिळाल्याने नववधू रेणूका व तिचे नातेवाईक भाराऊन गेले. तर व्हाटसअप ग्रुपवर रेणुकाच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले असता, येथील व्यापारी भगवानराव शिंदे, मधुकर कदम यानी प्रत्येकी दोन हजार १०० रुपये कन्यादान रुपी तर राहुल पदमाकर यानी मिक्सर, संघपाल भोरे यानी पंखा भेट दिला. येथील बँकेचे मॅनेजर गजानन जोजार, अमोल भारती यानी प्रत्येकी एक हजार १०० रुपये भेट दिली. अर्चना अंभोरे, पंजाब कांबळे, गौरव देशमुख, संजय वाघमारे, राजेंद्र जाधव, गणेश गव्हाणे यानी प्रत्येकी ५०० रु कन्यादानरुपी दिले. अशोक पाईकराव यानी २०० रुपये दिल्याने अनाथ रेणुकाच्या लग्नाला संसार उपयोगी साहीत्यात वाढ झाल्याने रेणुकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सोमवारी (ता. १५) मार्च रोजी रेणुकाचे लग्न पार पडले. आलेले साहीत्य बघून उपस्थीत ग्रामस्थांचे डोळे पानावले होते. यावेळी हरीशचंद्र चिलोरे, देविदास कल्याणकर, बंडू माटाळकर, रामेश्वर बोरकर, प्रभाकर दहिभाते उपस्थीत होते. या मदतीत सर्व आशादीप ग्रुपच्या सदस्यांचा मोठा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT