file photo 
नांदेड

सीईओ वर्षा ठाकूर जेंव्हा उंबरठ्यातील आदिशक्तीला बोलते करतात...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची वस्तुस्थिती व पाहणी करण्याच्या उद्देशाने मुदखेड येथे दौऱ्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मुगट गावात उंबरठ्यावर अभ्यास करीत असलेल्या आदिशक्तींना भेटण्याचा मोह आवरता आला नाही. मुगट गावातील आरोग्य केंद्राची पाहणी करुन परतत असतांना त्यांनी एका घरासमोर गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरत त्यांनी एका घराकडे वळत दरवाजात अभ्यास करत असलेल्या दोन मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारुन त्यांचे भावविश्व मोकळे केले. यातील एकीचे नावे पुष्पा ज्ञानेश्वर कदम तर दुसरी दिपिका रामकिशन कदम. पुष्पा दहावीत तर दिपिका चौथीत शिकते.

या दोन्ही मुलींचे आई- वडिल शेती करतात. शाळा कोविड-19 मुळे बंद असल्यामुळे या बहिणींची शाळा ओसरीवर सुरु होते. यातील एक दहावीत शिकत आहे तर दुसरी चौथीत. घरी तिच्या फक्त भावाकडेच असलेला मोबाईल शिक्षणासाठी तिने जवळ ठेवलेला. मोबाईलच्या माध्यमातून ती गणिताचा सराव करत असतांना कोणीतरी एक महिला आपल्या जवळ बसून बोलते आहे या कृतीमुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही आपली ओळख न देता मोकळा संवाद साधल्याने तिच्या स्वप्नांना आणखी बळ घेता आले.

मुगट गावात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थींनींची अधिक संख्या

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी हिरमुसले आहेत. त्यांच्यात कुठेही नैराश्य येऊ नये, अभ्यासाप्रती कटिबद्धता वाढावी यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांशी उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे एक अभियान आम्ही लवकरच सुरु करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले. मुगट गावात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थींनींची अधिक संख्या असल्याने या गावची तशी वेगळी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असेही त्या म्हणाल्या.मुगट येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल पर्यंत शाळा असून एकुण 16 वर्ग, 14 शिक्षक तर 365 पटसंख्या आहे. यात मुलींची संख्या 188 आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT