नांदेडला जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी रुग्णांशी संवाद साधला. 
नांदेड

जिल्हाधिकाऱ्यांमधला डॉक्टर जागा होतो तेव्हा...

अभय कुळकजाईकर

नांदेड - गुरूवार (ता. १८) वेळ दुपारी तीनची. पावसाची रिमझीम जोर धरुन सुरु झालेली. अशा वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटरला पोहचतात. अगोदर सर्व बाहेरील परिस्थितीची पाहणी करतात.
त्यानंतर त्यांच्यातला डॉक्टर जागा होतो आणि मग सर्व नियमांचे पालन करत डॉक्टर रुग्णांची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस करतात. घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल, असा विश्‍वास त्यांनी दिला. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे डॉक्टर आहेत. त्यामुळे साहजिकच ते जिल्हाधिकारी असले तरी त्यांच्यामधील डॉक्टर नेहमी जागा असतो. आणि त्याचाच प्रत्यय गुरूवारी (ता. १८) दुपारी आला. रुग्णालयात आल्यानंतर डॉ. विपीन यांच्यासोबत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, बालरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद चव्हाण, औषध वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड उपस्थित होते. 

परिसराची केली पाहणी
संपूर्ण परिसराची पाहणी करुन ते एका-एका गोष्टीचा आढावा घेतात. याठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा अधिक परिपूर्ण व्हावी यासाठी महापालिकातंर्गत स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था तत्काळ कशी करता येईल, याचे नियोजन सुरु असते. याच नियोजनात प्रत्यक्ष विष्णुपुरी प्रकल्पाला जावून तेथील प्रत्यक्ष पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन होते. 

बाधितांसोबत मनमोकळ्या गप्पा
कोविड डेडिकेटेड सेंटरला आपण आलोच आहोत तर प्रत्यक्ष बाधित पेशंट यांच्याशी चर्चा केल्यास नेमकी माहिती आपल्याला मिळेल म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन त्यांना भेटण्याचा निर्णय घेतात. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांची काळजीवजा धांदल उडते. पीपीईकीट घालून सुरक्षिततेचे जे नियम आहेत त्याचे पालन करुन ते सरळ कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन पॉझिटिव्ह पेशंटशी चर्चा करतात. या वार्डात असलेल्या सर्व सतरा बाधितांबरोबर ते मनमोकळ्या गप्पा मारतात. 

घाबरु नका, तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल
स्वत: जिल्हाधिकारी येथे येवून प्रत्यक्ष पाहणी करुन सुविधा कशा मिळतात याची सहानुभूतीने चौकशी करीत असल्याने काही रुग्णांचे हात नकळत जोडले जातात. “इथल्या सुविधा तुम्हाला चांगल्या वाटतात का? काही अडचणी आहेत का? आहार चांगला मिळतो का?” याची ते सरळ पेशंटला विचारणी करतात. उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा उत्तम असल्याचे सांगत कोविड पेशंट आपला कृतज्ञता भाव व्यक्त करतात. “घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल” असा विश्वास डॉ. विपीन प्रत्येकाच्या मनात पेरत सरळ शौचालयाच्या पाहणीसाठी वळतात. सोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाहणीसाठी रवाना होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar Rain Record : महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, 24 तासांत 513 मिमी पाऊस; मोडला तब्बल 123 वर्षांपूर्वीचा विक्रम, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 बंधारे पाण्याखाली, 3 मुख्य राज्य महामार्ग बंद; 'पंचगंगा' इशारा पातळीच्या अगदी जवळ, गगनबावड्यात 101 मिमी पाऊस

Latest Marathi News Update: खडकवासला धरणात येणाऱ्या ओढ्याला पूर, पाबे घाटरस्त्यासह महत्त्वाचे मार्ग बंद

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT