file photo 
नांदेड

कोण म्हणतं आपण कोरोना संकटाशी दोन हाथ करतोय....? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहराची परिस्थिती खरोखर वाईट्ट आहे...काल योगायोगानं इतवारा परिसरांत जाण्याचा योग आला तोही अगदी सकाळी 5.30 च्या सुमारास आणि नंतर 11 च्या सुमारांस... आधी होलसेल मार्केट मध्ये मग रिटेल मार्केट मध्ये... कोरोनाची भिती नाही की संक्रमणाची पर्वा नाही... कसलेही मास्क नाहीत आणि असले तरी ते मिशी झाकण्यासाठी अथवा गळ्यात लटकवण्यासाठी... लोकं नित्यनेमानं अंगाला अंग घासेपर्यंत चिकटून उभे रहातात, भाज्या विकताहेत... घेताहेत. कोण कोरोना? माहित नाही... आणि सोशल डिस्टंसिंगची पर्वाच नाही...

आणि सोशल डिस्टंसिंगची पर्वाच नाही...
मोंढा मार्केट मधून खरेदी करिता तारासिंघ मार्केटकडे गेलो... गुरुद्वारा चौरस्त्याजवळ ट्रॅफिकमध्ये अडकलो 15 ते 20 मिनिटं... गाड्याला गाड्या खेटून उभ्या... कित्येंकांच्या तोंडाला मास्क नाही... गुटखा खाणाऱ्यांना पिचकारीतच समाधान अजूनही मिळत आहेच... खोकणारे खोकलतच आहेत... शिंक मारणाऱ्यांना तर कसलीच फिकर नाही...  कोण कोरोना? माहित नाही... आणि सोशल डिस्टंसिंगची पर्वाच नाही...

कुणालाच कसलीच पर्वा नाही
वजिराबाद मार्केट मध्ये जाण्याचा योग आला त्याबाबद् मित्रांनी सांगीतले की लोकांना पर्वाच नाही.. अगदी फळविक्रेते, भाजीविक्रेते, फुटपाथविक्रेते... असे बसलेत जणू त्यांचा आणि कोरोनाचा कधी संबंधच येणार नाहीय... कुणालाच कसलीच पर्वा नाही... अगदी पाणीपूरीचे गाडे लागलेत.. लोकं पाणी पूरी खाताहेत... ब्रेडपकोडा चे गाडे लागलेत.. पार्सलच्या नांवाखाली कागदात बांधून दिले जात आहे आणि कित्येकजण तिथंच बाजूला उभे राहून पार्सल फस्त करत आहेत... कसले सॅनिटायझेशन? अन कसले सोशल डिस्टंसिंग...  कोण कोरोना? माहित नाही... आणि सोशल डिस्टंसिंगची पर्वाच नाही...

सोशल डिस्टंसिंगची पर्वाच नाही...
डॉक्टर्स लाईन असो किंवा कलामंदिर परिसर... लोकं अगदी ओल्या शेंगाच्या गाड्यावरून उचलून शेंगा खाताहेत... गाड्यावरील जांभळं चाखताहेत... चिकू कापून त्याची फाक तोंडात टाकून गोड आहे का नाही तपासत आहेत.. कलामंदीर मागील सोमेश कॉलनी छोटे भाजी मार्केट असो अथवा हिंगोली गेटवरील सकाळचे फुल मार्केट असो... किंवा बाफना कॉर्नरची मेकॅनिकची दुकाने असोत...  मला कोरोना होणारच नाही ह्या अविर्भावात लोकं वावरत आहे...  कोण कोरोना? माहित नाही... आणि सोशल डिस्टंसिंगची पर्वाच नाही...

मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण
कोरोनाचा प्रकोप आणखी किती दिवस चालणार आहे? माहित नाही, पण या निमित्ताने आपल्या सगळ्यांना नियमांत, शिस्तीत रहाण्याची / जगण्याची जी सवय या निमित्तानं लागणार आहे ती आपल्याच सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या लोकांना धडा शिकविणार कोण? कारण जे लोकं सोशल डिस्टंसिंग पाळत नाहित त्यांच्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळणाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी नाही का पडत आहे?

हा मानसिक खेळ चालला आहे
जे लोकं सोशल डिस्टंसिंग पाळत नाहीत ते पाळणाऱ्यांची चेष्टा करत आहेत, कोरोना वगैरे कांही नाही.. हा मानसिक खेळ चालला आहे... हा केवळ 
समाजात भिती पसरवण्याचा प्रयत्न आहे. असा सुध्दा दावा करणारे महाभाग आपला हा मुद्दा इतक्या हिरहिरीनं मांडतात कि मुकाटपणे कोरोनाशी मी 
लढेन ही मानसिकता केलेल्या सामान्य नागरिकाला हे वेगळंच मानसिक द्वंद्व झेलण्याची वेळ येत आहे. आणि मग ह्यामुळे सुध्दा कांही लोकांना मानसिक तणाव निर्माण होत आहे. ह्या व्यतिरिक्त सोशल डिस्टंसिंग अथवा कोरोनाची काळजी घेण्याच्या कितीही सूचना अथवा माहिती राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून अथवा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली असली तरी, माझं कोण काय वाकडं करु शकतं? ह्या अविर्भावात वागणाऱ्या ह्या सामाजिक अपराध्यांविरुध्द आता जनतेनंच आवाज उठविण्याची गरज आहे.
शब्दांकन- मनोज पुरोहीत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT