file photo 
नांदेड

महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार कल्याणकरांनी ‘का’ केली कानउघाडणी...?

प्रल्हाद कांबळे

नांदेड : तालुक्यातील निळा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांत वारंवार तांत्रिक बिघाड होत असून निळा व परिसरातील गावांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती केली परंतु कुठल्याही प्रकारची दखल महावितरणने घेतली नाही.  शेवटी आमदार बालाजी कल्याणकर यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निळा येथील उपकेंद्र गाठले. आपल्या सेवेत व कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईस सामोरे जा असा इशारा त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. 

आमदार बालाजी कल्याणकर यांनी निळा येथे शुक्रवारी (ता. १०) प्रत्यक्ष जाऊन ३३ केव्ही उपकेंद्राला भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुढील पाच दिवसात या भागातील बंद असलेला वीजपुरवठा सुरळीत करा तसेच उत्तर मतदार संघातील पाचही ३३ केव्ही उपकेंद्र सुरळीत सुरू राहिले पाहिजे. उपकेंद्रात कोणताही बिघाड झाला तर तात्काळ दुरुस्त करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड इशारा आमदार कल्याणकर यांनी दिला. निळा येथील ३३ केव्ही उपकेंद्र आज पंधरा ते वीस दिवसापासून तांत्रिक बिघाड झाल्याने बंद आहे. दोन ट्रांसफार्मरपैकी एक ट्रांसफार्मर चालू तर एक ट्रांसफार्मर बंद होता. यामुळे निळा, चिखली (बु), एकदरा, मरळक या गावासह परिसरातील अनेक गावांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.

महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

आमदार कल्याणकर यांच्या कानावर येताच त्यांनी तात्काळ दखल घेत निळा येथे प्रत्यक्ष जाऊन उपकेंद्राला भेट दिली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. येणाऱ्या पाच दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराही त्यांनी दिला. नागरिक विज बिल सुरळीत भरताहेत त्यांना आपण वीज पुरवठा देखील सुरळीत दिला पाहिजे. नागरिकांना त्रास द्याल तर तुमच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा आमदार कल्याणकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासोबत कार्यकारी अभियंता भूषण पहुरकर, उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता महाजन हे उपस्थित होते. तसेच परिसरातील बाबुराव कदम वडवणी, गजानन कदम यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT