file photo 
नांदेड

तोंडाला मास्क लावणे का आहे महत्त्वाचे...वाचाच...

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनमुळे येणारा भविष्यकाळ हा चांगला राहिलच याची आजतरी कोणालाही खात्री देता येणार नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यासाठीचा महत्वाचा उपाय हा तोंडाला मास्क लावणे आहे. जेणेकरुन दुसऱ्यांकडून आपल्याला आणि आपल्याकडून दुसऱ्यांना त्याचे संक्रमण होणार नाही. त्यामुळे कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे अत्यावश्‍यक आहे. 

लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर आता बाजारपेठेत तसेच रस्त्यावरही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्णही सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे आणि स्वतःची काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाला मास्क लावणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. 

डॉक्टर काय सांगतात...  
तोंडाला मास्क लावण्याचे दोन फायदे आहेत. त्यामध्ये एक म्हणजे दुसऱ्यांकडून आपल्याला संक्रमण होत नाही तर दुसरे म्हणजे आपल्याला दुसऱ्यांकडून संक्रमण होत नाही. कारण कोणाला कोरोना आहे, हे आपण सांगू शकत नाही. एखादा आपल्या आजूबाजूला कोरोनाचा वाहक असू शकतो आणि कोरोना संसर्गजन्य असल्यामुळे तो आपल्या नाकातोंडाद्वारे प्रवेश करु शकतो. अशा वेळी मास्क आपले संरक्षण करत असल्यामुळे तोंडाला मास्क असणे गरजेचेच नव्हे तर अत्यावश्‍यक असल्याचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य यांनी सांगितले. 

प्रतिबंधात्मक उपाय हाच उपचार
कोरोनावर अजूनही औषध सापडले नसून संशोधन सुरु आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच उपचार असल्याचे डॉ. हंसराज वैद्य यांनी सांगितले. तोंडाला मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे तसेच प्रतिकारशक्ती वाढवणे हे प्रतिबंधात्मक उपचार सध्या आहेत. त्याचे पालन करावे तसेच अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथीच्या गोळ्या तीन दिवस घेणे. तसेच पथ्य म्हणून तंबाखू, बिडी, सिगारेट, मद्य प्राशन करु नये. कांदा, लसूण, अद्रक, कोथींबीर, पुदिना, हिंग असे उग्र वास येणार पदार्थ किमान तीन महिने खाऊ नयेत, असे आवाहनही डॉ. वैद्य यांनी केले आहे. 

महिला बचत गटाला मिळाला रोजगार
दरम्यान, जिल्ह्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून कापडी मॉस्क बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या मार्फत आत्तापर्यंत प्रत्येक तालुक्याने जवळपास दीड हजार असे जिल्ह्यात २० हजार मास्क बनविण्यात आले आहेत. महिला बचत गटाला या मास्कच्या माध्यमातून प्रत्येक मास्कमागे दहा रुपये रोजगार मिळाला आहे. अजूनही मास्क बनविण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर इतर संस्था, कंपनीदेखील मास्क बनवत असून या मास्कच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. 

मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नांदेड महापालिकेच्या वतीनेही तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क किंवा स्वच्छ रुमालाचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

असा करावा मास्कचा वापर
कोरोनाचा संसर्ग हा तोंड किंवा नाकाद्वारे होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपले तोंड आणि नाक पूर्णतः झाकले जाईल, असा मास्क वापरावा. तसेच मास्क नियमित स्वच्छ ठेवावा त्याला वारंवार हात लाऊ नये. स्वच्छ रुमालही चांगला आहे पण शक्यतो मास्कच वापरावा, जेणेकरुन कोरोनाचा शिरकाव होणार नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT