file photo 
नांदेड

पतीस जिवंत जाळल्याप्रकरणी पत्नी व मुलास जन्मठेपेची शिक्षा; बिलोली न्यायालयाचा निकाल

विठ्ठल चंदनकर

बिलोली ( जिल्हा नांदेड) : मुलाच्या मृत्यूच्या इन्शुरन्सच्या पैशावरुन निर्माण झालेल्या किरकोळ वादातून रॉकेल ओतून वडीलांना जिवंत जाळल्याप्रकरणी नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील रेणुकाबाई पिल्लेवाड व तिचा मुलगा संभाजी पिल्लेवाड या दोघांना बुधवारी (ता. तीन) बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील रामचंद्र पिल्लेवाड यांच्या एका मुलाचे अपघाती निधन झाले होते. मुलाचे अपघाती निधन झाल्याने त्यास इन्शुरन्सचे पैसे मिळणार होते. मिळणाऱ्या पैशामुळे त्यांच्या घरात वाद निर्माण झाले. ता. २३ आॅगस्ट २०१८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रामचंद्र पिल्लेवाड हा घरासमोर बसला असता त्याची पत्नी रेणुकाबाई व मुलगा संभाजी तेथे आले. इन्शुरन्सच्या पैशाच्या कारणावरुन रेणुकाबाई हिने आपले पती रामचंद्रच्या अंगावर रॉकेल ओतले, तर मुलगा संभाजी यांनी त्यांना पेटवून दिले. आग लागताच रामचंद्र यांचा भाऊ दिगंबर पिल्लेवाड व पुतणीने आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात रामचंद्र यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मयताचा भाऊ दिगंबर पिल्लेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामतीर्थ पोलिस ठाण्यात मयताचा मुलगा व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. घटना तपासानंतर आरोपीविरुद्ध बिलोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे दिलेले पुरावे व युक्तिवाद लक्षात घेऊन मयताचा मुलगा संभाजी रामचंद्र पिल्लेवाड व पत्नी रेणुकाबाई रामचंद्र पिल्लेवाड यांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. संदीप कुलकर्णी कुंडलवाडीकर व पैरवीकार पोलिस नाईक प्रशांत लक्ष्मणराव केसराळीकर यांनी काम पाहिले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT