sambhaji nagar  sakal
नांदेड

Nanded : नियमबाह्य पद्धतीने गतीरोधक

हाऊसिंग सोसायटी, कॉलनी आदी ठिकाणी अंतर्गत रस्त्यावरही कोणतीही परवानगी न घेता बिनधास्त गतीरोधक उभारण्याचा प्रकार सर्रास सुरू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गतीरोधक तयार करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. मात्र, हे गतीरोधक नियमबाह्य पद्धतीने निर्माण केले जात आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्या त्या भागातील हाऊसिंग सोसायटी, कॉलनी आदी ठिकाणी अंतर्गत रस्त्यावरही कोणतीही परवानगी न घेता बिनधास्त गतीरोधक उभारण्याचा प्रकार सर्रास सुरू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ याकडे लक्ष द्यावे आणि हे जीवघेणे गतीरोधक काढून संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी अनेक वाहनधारकांनी केली आहे.

वाहने सुसाट वेगात चालवू नयेत तसेच वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात येतात. मात्र, सध्या नांदेड शहरामध्ये अनेक भागात नियमांची सर्रास पायमल्ली होत असून बिनधास्त गतीरोधक बसविण्यात येत आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी बसविण्यात आलेले गतिरोधकच आता जीवघेणे ठरत आहेत. नियमांना बाजूला सारून काही जण विनापरवानगी रस्त्यावर गतीरोधक बसवित असल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. शहरात मुख्य रस्त्यावर तसेच कॉलनी, सोसायटी किंवा अरूंद गल्लीमध्ये त्या त्या भागातील नागरिक परवानगी न घेता गतीरोधक उभा करत आहेत.

असे रस्त्यावर उभारलेले गतीरोधक वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यावर झेब्रा क्रॉसिंगप्रमाणे पांढऱ्या रंगाचे पट्टे नसल्याने ते चालकांना दिसत नाहीत. काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने गतीरोधक लावण्यात आल्याने वाहने बंद पडून अपघातांचा धोका वाढला आहे.

रस्त्यावर कोठे गतिरोधक असणे गरजेचे आहे, हे ठरविण्यासाठी आधी त्या रस्त्याचे वाहतूक सर्वेक्षण केले जाते. त्यात त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, त्यांचा प्रकार, त्यांची वाहतुकीची गर्दी, लोकांची वर्दळ तसेच जवळ असलेले महत्वाचे किंवा संवेदनशील ठिकाण, रस्त्यावरील मर्यादित वेग अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्याचबरोबर गतीरोधकांचा प्रकार आणि उंची सुद्धा यावरून ठरविली जाते. त्यामुळे परवानगी घेऊनच गतिरोधक उभारावेत. अनधिकृतरित्या गतीरोधक उभारल्यास आणि त्याबाबत कोणी तक्रार केल्यास महापालिका प्रशासनाद्वारे असे गतीरोधक काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येतील.

- गिरीष कदम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

गतिरोधकासाठी काय आहेत नियम

रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण रहावे, यासाठी ठराविक अंतरावर तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालय आदींजवळ रस्त्यावर गतिरोधक बसवले जातात. तसेच रात्रीच्या सुमारास गतीरोधक दिसण्यासाठी रिफ्लेक्टर बसविण्यात येतात. कोणत्याही मार्गावर गतिरोधक असल्यास त्यावर ‘पुढे गतिरोधक आहे’, असे फलक दिसेल असे बसविणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्या रस्त्यावर व कोणत्या ठिकाणी गतिरोधक असावेत, याचीही नियमावली आहे. वाहतूक विभागाच्या परवानगीशिवाय आणि भारतीय रस्ते समितीच्या (आयआरसी) नियमानुसार गतिरोधक बसवणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT