file photo 
नांदेड

महिला दिन : कोरोनाच्या आव्हानात्मक काळात; एक हजार 54 मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आजच्या काळातील कोणतेही असे क्षेत्र सुटले नसून सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला अपूर्व ठसा उमटवला आहे. कोरोनासारख्या आव्हानात्मक काळात महिलांनी आपले कसब व योगदान पणाला लावून जे आव्हान पेलून दाखविले त्याला तोड नाही, या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या शुभसंदेशात महिलांच्या योगदानाचा गौरव केला. 

सोमवार (ता. आठ) जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रम व वैद्यकिय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोरोना वॉरीयर्स यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार व जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभागातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.

कोरोनासमवेत इतर वैद्यकिय सेवा-सुविधा सामान्य जनतेसाठी तत्पर ठेवणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेत ग्रामीण भागात सेवा-सुविधा पोहचविण्यासमवेत आरोग्य विभागाने तब्बल एक हजार 58 कॅट्रॅक्स आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करुन यासाठी योगदान देणाऱ्या डॉ. रोशन आरा तडवी यांच्यासह इतर महिला अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गौरव केला. कोरोनाच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभाग सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना वाकोडे, डॉ. सुजाता राठोड, डॉ. खान साबा अशरफ, डॉ. अर्चना बजाज, प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योती बागल, परिचारिका मालती वाघमारे, जयश्री वाघ, अहवाल नोंदणी विभागातील शुभधा गोसावी, अर्पणा जाधव, रुग्ण व्यवस्थापक डॉ. मसरत सिद्दीकी, स्वच्छता विभागातील किरण हटकर, कोमल दुलगच, समुपदेशक ज्योती पिंपळे, संतोषी रतनसिंघ मंगोत्रा, विशाखा आर. बापटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हॅपी क्लबचे कार्यकर्ते मोहमंद शोएब यांच्या आई शबाना बेगम यांचाही प्रातिनिधक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिना सोलापूरे यांनी केले. यावेळी महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, शरद मंडलिक, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT