शेतीतील लाकडी अवजारे नामशेष 
नांदेड

ग्रामीण भागातील लाकडी अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर

सुतार व्यवसायिकांना यासाठी वर्षाची बोलणी करुन घ्यावी लागायची. कालांतरानी पारंपारिक पद्धतीने शेती करणे थांबवून आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला.

विठ्ठल लिंगपुजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : ग्रामीण भागात पूर्वी बैलांच्या साह्याने शेतीची सगळी कामे करावी लागायची. त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लाकडापासून बनवलेली अवजारे असायची. त्यामुळे पेरणीपूर्वी अवजाराची दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुतार व्यवसाय करणाऱ्याकडे सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी करताना पहावयास मिळत होते.

त्यामुळे सुतार व्यवसायिकांना यासाठी वर्षाची बोलणी करुन घ्यावी लागायची. कालांतरानी पारंपारिक पद्धतीने शेती करणे थांबवून आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला. त्यामुळे शेतीत वापरात येणारे लाकडी अवजारे इतिहासजमा होत आहेत. अलीकडच्या काही वर्षापासून लाकडी नांगर, वखर, कोळपे आदी अवजारे काळ्यामातीतुन काढता पाय घेऊ लागली आहेत.

हेही वाचा - नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत.

पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडायला लागली. शेती कामासाठी लागणारे सगळीच लाकडी अवजारे यांची वाढती किंमत, दुरुस्तीचा खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने शेतीची कामे होऊ लागली. शेतकऱ्यांचा वेळही वाया जात नाही. शेतीतील कामे वेळेवर होत आहेत. नाहीतर एक एकर शेती नांगरणी करण्यासाठी सात ते आठ दिवस लागायचे. तेच काम आज तासात होत आहे. आजही ग्रामीण भागात कापूस लागवड करण्यासाठी लागणाऱ्या स-या लाकडी अवजाराचाच शेतकरी वापर करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT