वखार महामंडळ गोदाम 
नांदेड

केंद्रीय वखार महामंडळाच्या ठेकेदाराकडून काम बंद; शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ

केंद्रीय वखार महामंडळाचे नांदेड येथे गोदाम असून या गोदामामध्ये जवळपास १५० ते २०० कामगार दररोज काम करीत असतात.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या (center worker mahamandal) वाहतूक ठेकेदाराने स्वहित जपण्यासाठी येथील कामगारांवर उपासमारीची वेळ आणली असून केंद्रीय वखार महामंडळाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन मोठा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार राष्ट्रीय अण्णाभाऊ साठे कामगार संघटनेचे भारत खडसे यांनी जिल्हाधिकारी, (collector nanded) नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (Work stopped by Central Warehousing Corporation contractor; Time of starvation on hundreds of workers)

केंद्रीय वखार महामंडळाचे नांदेड येथे गोदाम असून या गोदामामध्ये जवळपास १५० ते २०० कामगार दररोज काम करीत असतात. सध्या देशासह राज्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच वखार महामंडळाच्या वाहतूक ठेकेदाराने वाहतूकीचे दर वाढवल्यामुळे शासनाने वाढीव दर न दिल्यामुळे येथील वाहतूकीचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथे काम करणार्‍या १५० ते २०० कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता- सावधानतेचा इशारा

केंद्रीय वखार महामंडळाचे दर कमी असल्यामुळे सदर सेंटरचे व एफसीआयचे अधिकार्‍यांना हाताशी धरुन वाहतूक ठेकेदार होलानी यांनी वाहतूक बंद केली. एमएसडब्ल्यूसी येथे अधिकचा फायदा असल्यामुळे तेथील सेंटर चालू ठेवून निव्वळ नफा कमावण्याच्या हिशोबाने सीडब्ल्यूसी येथे काम करणार्‍या कामगारांवर उपासमारीची वेळ आणली असल्याचे राष्ट्रीय अण्णाभाऊ साठे कामगार संघटनेचे भारत खडसे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनात नमूद केले आहे. केंद्रीय वखार महामंडळाचे काम तात्काळ सुरु करुन कामगारांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT