file photo 
नांदेड

जागतीक चिमणी दिन विशेष : कुरुळ्यातील युवकांचा चिमणी संवर्धनासाठी पुढाकार; व्यवसायातून जोपासला अनोखा छंद

विठ्ठल चिवडे

कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीनुसार प्रत्येकाच्या ठायी गुणभिन्नता असते. अंगी असलेले आविष्कार आणि नवप्रतिभेचा वापर पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी होतो. ज्यामुळे समतोल साधण्यास मदत होते. काही मोजक्याच व्यक्ती यासाठी जाणिवेतून पुढाकार घेतात आणि त्यांच्या हातून पर्यावरणपूरक असे उपक्रम घडून येतात. त्यापैकीच कुरुळा येथील नारायण पांचाळ व शेलदरा येथील सिद्धार्थ काळे या युवकानी चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून व्यवसायातून त्यांनी हा अनोखा छंद जोपासला आहे.

कुरुळा येथील नारायण माधव पांचाळ हा वडिलोपार्जित सुतारकाम व्यवसाय करणारा अवलिया. अंगी विशिष्ट प्रतिभा असल्यामुळे पारंपरिक व्यवसायातही नवनिर्माणाच कौशल्य आत्मसात करून विविध प्रकारची लाकडी उपकरणे नारायण यांनी तयार केली आहेत. बहुउपयोगी नाविन्यपूर्ण लाकडी वस्तू ते टाकाउपासून टिकाऊ यातही या युवकाचा हातखंडा आहे. तसेच पक्षीमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले शेलदरा येथील सिद्धार्थ काळे या दोघांनी चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.

बालमनाचा ठाव घेणारी रचना कृत्रिम होत आहे:

ग्रामीण भागात दिवसेंदिवस होणारे शहरी बदल यामुळे अंगणात बागडणाऱ्या चिऊताईंची संख्या आता कमी होतानाचे चित्र आहे. ग्रामीण बालमनावर चिमणी पक्षाचे जिवंत आणि सजीव चित्रण आता दुर्मिळ होत असून चिऊ चिऊ ये, चारा खा- पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. ग्रामीण भागातील बालमनाचा ठाव घेणारी ही रचनाच आता कृत्रिम होताना पाहायला मिळते.

चिमण्यांच्या आयुर्मानावर परिणाम होतोय:

नष्ट होणारी वनसंपदा आणि आधुनिक बांधकाम पद्धती यामुळे पूर्वी घराला असणारी चिमण्यांची घरटी आता दुरापास्त होताना दिसत आहेत. हवामानातील बदल, उष्मावृद्धी आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक याचा थेट परिणाम हा चिमण्यांच्या आयुर्मानावर होत असल्याने मोठ्या प्रमाणात अंगणात होणारा चिवचिवाट आता ओसरु लागला आहे.

जाणिवेतून जपली भूतदया:

या जाणिवेतूनच व्यवसायबरोबर नारायण पांचाळ यांनी मागील चार वर्षांपासून टाकाऊ प्लायवूड पासून चिमण्यासाठी असंख्य कृत्रिम निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. यामुळे घरट्यासाठी जागा शोधणाऱ्या चिमण्यांना यामुळे आधार मिळणार असून ऊन, वारा, पाऊस आणि इतर मोठ्या पक्षापासून त्यांचे संरक्षण होणार आहे. तर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या चिमण्यांना आधार व्हावा यासाठी काळे यांनी टाकाऊ प्लॅस्टिक बॉटल आणि मातीची येळणी यापासून चिमण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा:

ही कृत्रिम घरटी आणि प्लॅस्टिक कुंडी नारायण आणि सिद्धार्थ यांनी ता. २० मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पूर्वदिनी कुरुळा परिसरासह विविध ठिकाणी भेट देऊन जैवविविधता संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यातून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या चिमण्यांसाठी इतरांनीही पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे पक्षीमित्र काळे आणि पांचाळ यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT