nanded sakal
नांदेड

Nanded News : सव्वातीन कोटींचा मुद्देमाल मिळाला परत ; पोलिस विभागातर्फे कार्यक्रम,तक्रारदारांमध्ये समाधानाची भावना

जिल्हा पोलिस दलाकडून विविध पोलीस ठाण्यातंर्गत विविध गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे, चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, विविध प्रकारची वाहने व इतर वस्तू असा एकूण तीन कोटी २३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना (ता.२६) कार्यक्रमात परत करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा पोलिस दलाकडून विविध पोलीस ठाण्यातंर्गत विविध गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे, चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, विविध प्रकारची वाहने व इतर वस्तू असा एकूण तीन कोटी २३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना (ता.२६) कार्यक्रमात परत करण्यात आला आहे.

यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशीकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलोस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक (गृह) डॉ. अश्विनी जगताप, श्रीमती स्नेहल कोकाटे आदींच्या हस्ते फिर्यादी यांना किंमती मुद्देमाल परत करण्यात आला. मुद्देमाल हस्तांतर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, जगदीश भंडरवार, श्री तुगावे, श्री. आरेसवार, श्री. मिटके, गंगाप्रसाद दळवी, त्र्यंबक भोस्कर, श्री. कदम, श्री. पचार, श्री. कागणे, श्री. बेरळीकर, टोम्मे, श्रीमंगले, पोलीस कर्मचारी राठोड व वंजारे आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

कायदेशीर बाबींची केली पुर्तता

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या किंमती मुद्देमालामध्ये सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९८ लाख ५८ हजार ११२ रुपये. इतर मुद्देमाल ज्यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच इतर मोठी वाहने असा एकूण दोन कोटी २५ लाख १९ हजार सातशे रुपये तसेच सायबर सेल विभागाकडून हरवलेले, गहाळ किंवा चोरलेले असे २१ लाख ३१ हजार ९५ रुपयांचे एकूण १२८ मोबाईल असा एकूण तीन कोटी २३ लाख ७७ हजार ८१२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन कायदेशीर बाबींची पूर्तता करुन फिर्यांदी यांना परत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT