file photo 
नांदेड

अरे वा...जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रुग्णांसमवेत भोजनाचा आस्वाद

अनिल कदम

देगलूर ( जिल्हा नांदेड ) : मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या शहापूर (ता. देगलूर) येथील आरोग्य मेळाव्यात रुग्णांसमवेत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा आढावा घेऊन उपाययोजनाबाबत योग्य ते निर्देश यंत्रणेला दिले. कोरोना काळापासुन येथील दोन वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर असल्याने संबंधिताविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांना दिले. 

येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती पाळेकर या तेलंगणामध्ये वास्तव्यास असून ते शहापूर येथे दैनंदिन कर्तव्यावर येत नसल्याने येथील आरोग्य सेवेवर फार मोठा परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वामी यांनी विनापरवानगी कर्तव्यावर सतत गैरहजर राहत असल्याने त्यांच्याही तक्रारी प्रशासनास आल्याने या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे निर्देश यंत्रणेला दिले. 

या मेळाव्यात ७८ गरोदर माता, ४३ स्तनदा माता, ५२  बालकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना वैद्यकीय औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी मानव विकास योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, गट शिक्षणाधिकारी श्री जाधवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सायनोड, उपसभापती जगदीश चीतंलवार, विलास  रेड्डी यालावार, मलरेडी यालावार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी येथील जि. प. प्रशाला भेट देऊन तेथील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी शहापूर परिसरात प्रथमच मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेल्या कोथिंबीर या पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT