Writing skills are declining Outcome of the online class
Writing skills are declining Outcome of the online class  sakal
नांदेड

नांदेड : लेखन कौशल्याचा होतोय ऱ्हास

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे गतवर्षी परीक्षा न झाल्याने पहिली ते नवव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी थेट वरच्या वर्गात ढकलल्या गेले. ना शिक्षकाची कसोटी लागली ना विद्यार्थ्यांची. मात्र, या प्रक्रियेत मुलांच्या हाती स्मार्टफोन आला. आॅनलाइन वर्ग सुरु झाले. परिणामी मुलांमधील लेखन कौशल्याचा ऱहास होताना दिसत आहे. लेखनाची आवडही कमी होत असून वाचनाची सवयही तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आॅनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थी तणावमुक्त झाले. मोबाईलच्या स्क्रीनवर चिमुकली बोटं थुई...थुई नाचू लागल्यानंतर मुलांच्या लिखाणातील स्मार्टपणा हरवला. लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा ऱ्हास होत असून थेट सर्च करून आवश्यक तेवढाच भाग स्वीकारण्याची सवय लागल्याने पुस्तक वाचनापासून मुले दुरावत आहेत. हे सर्व प्रकार म्हणजे भविष्यात मुलांचा मोबाईल सिंड्रोमच्या दिशेने प्रवास सुरु झाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. याचे दुष्परिणाम पुढील दहा वर्षात दिसतील, अशी भीती शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनापूर्वी परीक्षेची तारीख जवळ येत असताना पोटात भीतीने गोळा येत होता. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही परीक्षा सुरु असल्याचे दृश्य दिसायचे. पण परीक्षांमध्ये चांगले गुण मिळताच सारा तणाव दूर पळून जात होता. पण आॅनलाइन परीक्षापद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही बिनधास्त झाले आहेत.

पालकांसाठी

  • मुलांवर दबाव टाकणे टाळावे

  • इतर मुलांशी तुलना करू नका

  • मुलाची आवड जपावी

  • मुलांना केवळ नियमांच्या चौकटीत बांधून ठेवू नका

  • क्षमतांचा विचार करत त्याला प्रोत्साहित करा

  • परीक्षा आॅनलाईन असो की, आॅफलाईन मुलांसोबत राहा

  • मुले तणावात येताच त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करा

  • मुलाच्या वर्तनाकडे, त्यांच्या मानसिक बदलाकडे लक्ष द्या

मोबाईलमुळे भविष्यातील धोके

  • एकाग्रतेचा भंग

  • डोळ्यांवर परिणाम

  • कमी ऐकू येणे

  • कानातून आवाज निघणे

  • कान दुखणे

  • लक्षात न राहणे

  • चिडचिड करणे

  • व्यायामाकडे दुर्लक्ष

  • डी जीवनसत्वाचा अभाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT