Crime esakal
नांदेड

Crime News : अनैतिक संबंधातून युवकाला संपविले; महिलेसह तीन संशयित ताब्यात

नांदेड शहरापासून जवळच असलेल्या रहिमपूर भागात अनैतिक संबंधातून युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (ता. १७) उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - शहरापासून जवळच असलेल्या रहिमपूर भागात अनैतिक संबंधातून युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (ता. १७) उघडकीस आली. शेख शहबाज शेख शकील (वय २३) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.

रहिमपूर भागात युवकाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शेख शहबाज याच्यावर धारदार शस्त्राने चेहऱ्यावर अनेक वार करण्यात आले असून, तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात मरण पावला. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथे पाठविला.

त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन.एस.आयलाने यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरू केला. काही तासांच्या आतच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन दिवसांत दोन खून

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहेत.

परंतु गुन्हेगारी रोखण्यात ग्रामीण पोलिसांसह डीवायएसपीच्या पथकालाही अपयश आले आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांकडूनच अशा घटना घडत असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT