nanded sakal
नांदेड

Nanded News : शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा परिषद शाळा दत्तक

सर्वांगीण विकास प्राप्त करून देण्याचा केला निर्धार

सकाळ वृत्तसेवा

हाणेगाव : जिल्हा परिषद हायस्कूल हाणेगाव शाळेचा सर्वांगीण विकास करून पूर्ववत वैभव प्राप्त करून असल्याचे जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी हाणेगाव येथे गुरुवारी (ता.२७) रोजी शाळेच्या भेटी दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार केला.

हाणेगाव हे माझ्या वडिलांची जन्मभूमी आहे, तसेच माझ्या कुटुंबातील अनेकांनी या शाळेत शिकले मोठे झाले यामुळे माझ्या गावातील शाळेची प्रगती व्हावी या उद्देशाने मी हाणेगाव जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यामुळे मी शाळा दत्तक घेतली आहे.

यामध्ये शासकीय योजनेतून एक वर्ग खोली, संरक्षण भिंतीसाठी निधी देणार असून गावातील सरपंच, उपसरपंच सहित सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहभाग घेवून ‘माझा गाव माझी शाळा’ हे अभियान तयार करून सर्वांनी सहकार्य करावे असे आदेश सुद्धा यावेळी डॉ. बिरगे यांनी दिले.

या वेळी गट शिक्षणाधिकारी तोटरे, विस्तार अधिकारी मनियार, सरपंच शारदादेवी राठोड, संचालक शंकर राठोड, उपसरपंच मुजीपोद्दीन चमकुडे, विवेक पडकंठवार, दिलीप बंदखडके, उमाकांत पंचगल्ले, संजय काडगे, यादव सूर्यवंशी, मुख्याध्यापक आमगे, किशोर आडेकर, चांद मुजावर, शालेय समिती अध्यक्ष चांद बागवान, उपाध्यक्ष, सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक आमगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार दिलीप वाडीयार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT