file photo 
नांदेड

जिल्हा परिषदे अंतर्गत बदल्यांचा हंगाम ठरला, समुपदेशनमागे वशिला

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. ता. २६ ते ता. ३० जूलैदरम्यान ह्या बदल्या होणार आहे हे आता निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घेत जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिस बंदोबस्तासाठी पत्र व्यवहार केला आहे. 

नांदेड सर्वसाधारण सभेला गर्दी न होता नियम पाळले जावेत म्हणून जिल्हा परिषदेची पहिल्यांदाच ऑनलाइन सभा घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेत सर्व साधारण बदल्यांच्या निमित्ताने गर्दी जमली जात असल्याने जिल्हा परिषदेतील या विरोधाभास दिसुन येत आहे. समुपदेशन पद्धतीने होणाऱ्या बदल्यांच्या वेळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेने बदल्याचे वेळापत्रक जाहीर केले असून पाच दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचा मेळावा भरणार आहे. बाजारपेठेत जशी खरेदीदारांची गर्दी होते तशीच गर्दी जिल्हा परिषदेत होणार आहे.

ता. २६ ते ३० जुलै या कालावधीत हा बदली मेळावा जिल्हा परिषदेत भरला जाणार 

१५ बदल्यांचे नियम टाकून शासनाने बदल्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. ह्या बदल्या कशा होणार याची उत्कंठा सामान्य लोकांना लागली आहे. अखेर जिल्हा परिषदेने त्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहेत. बदल्या प्रक्रियेसाठीचा मुहूर्त निश्चित केला आहे. ता. २६ ते ३० जुलै या कालावधीत हा बदली मेळावा जिल्हा परिषदेत भरला जाणार आहे. महिला व बालकल्याण, बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, ग्रामपंचायत, अर्थ, सामान्य प्रशासन, शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभागातील    प्रत्येकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेने पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र पाठवले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर ठेवत सध्या सर्वत्र ऑनलाइन कारभार चालू आहे. यात जिल्हा परिषदेनेही ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेऊन योगदान दिलेले आहे. गर्दी टाळण्यासाठी ही सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली परंतु आता त्यात जिल्हा परिषदेने आपला दृष्टीकोन बदलला आहे. तेव्हा सर्वसाधारण सभेला गर्दी नको म्हणणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी आता बदल्यांसाठी मात्र प्रत्यक्ष समुपदेशन पद्धत अवलंबून गर्दीला आमंत्रण दिले आहे. किंबहुना गर्दी होणार नाही हे गृहीत धरून जिल्हा परिषदेने पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र पाठवले आहे. त्यामुळे गर्दी झाली तरी बदल्या होणारच हे आता निश्चित झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT