navratri festival  esakal
नवरात्र

Dashera 2022 : जाणून घ्या या वर्षीच्या दुर्गा विसर्जनाचा मुहूर्त,तारीख आणि वेळ

दशमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा

Navaratri 2022: सध्या नवरात्रीचा सण संपूर्ण भारतात खूप जल्लोषात सुरू आहे, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. दहा दिवस दुर्गा देवीची मूर्ती घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठा करून घट मांडून पूजा केली जाते, या मूर्तीचे दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते.

यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 05 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवी पृथ्वीवर फिरते आणि भक्तांमध्ये राहून त्यांचे दुःख दूर करते.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात दुर्गा देवीची मूर्ती मंडपात विराजमान केली जातात. घरोघरी घटस्थापना केली जाते. नऊ दिवस लोकं हा सण खूप जल्लोषात साजरा करतात, सगळीकडे गरबा दांडिया खेळ जातो, लोकं नऊ दिवस उपवास करतात, अगदी अनवणीही फिरतात. यानंतर दशमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून देवीला निरोप दिला जातो.

यंदाच्या दुर्गा विसर्जनाची तारीख, शुभ वेळ आणि पद्धत काय आहे? जाणून घेऊया...

दुर्गा विसर्जन 2022 तारीख

पंचांगानुसार दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. यावर्षी दुर्गा विसर्जन 05 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. विजयादशमी म्हणजेच दशमीच्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून मातेला निरोप दिला जाईल.

दुर्गा विसर्जन 2022 शुभ मुहूर्त

आश्विन महिन्यातील दशमी तिथी 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:20 पासून सुरू होत आहे. त्याच वेळी, तो दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता संपेल. पण आपण कधीही सुर्यभागी म्हणजे सूर्योदयापासून सुरू होणारी तिथी धरतो त्यामुळे मुहूर्त सूर्योदयापासून सुरू होऊन दुपारी 12 पर्यंत असेल.

दुर्गा विसर्जन पद्धत

- शास्त्रानुसार देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची यथासांग पूजा करावी.

- घटस्थापनेमध्ये पेरलेले धान्य दुर्गा विसर्जनाच्या दिवशी कुटुंबात वाटून घ्यावेत आणि काही दागिने तिजोरीत ठेवावेत, त्यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही.

- कलाशामधले पाणी आधी घरभर शिंपडून घ्यावे आणि मग उरलेले पणी नदीत किंवा झाडात टाकावे. ते पाणी फेकू नका नाहीतर देवी कोपेल.

- या नऊ दिवसात देवीला अर्पण केलेले सौभाग्य अलंकार आणि इतर गोष्टी देवीच्या मूर्तीच्या विसर्जन करतांना त्याबरोबर विसर्जीत कराव्यात.

- दुर्गा देवीची मूर्ती विसर्जित केल्यावर नदीकाठची थोडी वाळू घरी आणून घरभर टाकावी किंवा तिजोरीत ठेवावी, जिथे देवीची प्राणप्रतिष्ठा केली असेल ती जागा स्वच्छ पुसून तिथे रांगोळीने स्वस्तिक काढवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT