Navratri 2022 esakal
नवरात्र

Navratri 2022 : अष्टमीला देवीच्या जागराला करा काळ्या चण्याची चविष्ट भाजी

नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाची आता सांगता होत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाची आता सांगता होत आहे. गरबा रात्री, दुर्गापूजा या सर्वच दिवसांचा लोक आनंद घेतात. आज नवरात्रीमधील ८ वा दिवस आहे. काही लोक आज जागर करतात. तर, काही लोक केवळ उसळ थालीपीटाचा नैवेद्य दाखवतात. सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक म्हणजे महाअष्टमी मानला जातो. काळ्या चण्याची सुकी भाजी आणि त्यासोबत पूरी अथवा धपाटे केले जातात. आज आपण काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ते पाहुयात.

साहीत्य

काळे चणे - 1 कप/250 ग्रॅम, तमालपत्र – १, चवीनुसार मीठ, तूप - 3 ½ टेबलस्पून, आले - १ इंच, हिरवी मिरची – २, लाल मिरची पावडर - 2 टेबलस्पून, जिरे पावडर - 1 टेबलस्पून, हळद पावडर - ½, टेबलस्पून, धने पावडर - 3 चमचे, काळी मिरी पावडर - ½ टेबलस्पून, काळे मीठ - 1/2 टेबलस्पून, आमचूर पावडर - 2 चमचे, भाजलेली कसुरी मेथी - 1 टेबलस्पून, उकडलेले काळे चणे – १ टेबलस्पून, चिरलेली कोथिंबीर

कृती

- चणे रात्रभर भिजत ठेवावे. गॅसवर कुकर गरम करून त्यात चणे. एक तमालपत्र, मीठ आणि थोडं तूप घाला. मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करा. चणे नीट शिजवून घ्या.

- मिरची, तिखट, जिरेपूड, हळद, धने पावडर, काळी मिरी पावडर, काळे मीठ, आमचूर पावडर आणि भाजलेली कसुरी मेथी घालून बारीक पेस्ट करा. हा मसाला बनवताना त्यात एक चमचा उकडलेले चणे देखील घाला. याची जाडसर पेस्ट तयार करा.

- कढईत थोड तूप गरम करा. त्यात जिरे, हिंग टाका. त्यात तुम्ही तयार केलेला मसाला घाला. मसाला व्यवस्थित शिजल्यावर उकडलेले चणे घाला. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. चवीनुसार मीठ घाला. सजावटीसाठी कोथंबीर घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT