navratri festival  esakal
नवरात्र

Navratri 2022: नवरात्री उपवासात बाहेरचं पॅकबंद पदार्थ खाताय? जाणून घ्या तोटे

बाहेरचं पॅकबंद पदार्थ खाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नवरात्रीच्या काळात बाजारातून आणलेले इंस्टंट पॅकेट मधले पदार्थ खाणे हानिकारक ठरू शकते.नवरात्रीचा सण सुरू झाला आहे, सगळीकडे खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे; हिंदू धर्मात नवरात्रीला देशात खूप महत्त्व आहे. हा सण भारतभर इतर सणाप्रमाणेच मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याशिवाय देवीचे भक्त तिला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात.

तसेच अनेक जण उपवास करतांना फराळ म्हणून बाहेरचं पॅकबंद पदार्थ खात असतात, पण ह्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. मुळात म्हणजे हे पॅकेज्ड फूड बनवतांना स्वच्छतेची काळजी घेतली जातेच अस नाही, अनेकदा ते पदार्थ जास्त वेळ टिकावे म्हणून त्यावर काही उपचार केलेले असतात हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

बाहेरचं पॅकबंद पदार्थ का खाऊ नये?

आजकाल उपवासाचे खाद्यपदार्थ बाजारात मिळतात, ज्यामध्ये बटाटा चिप्स, पापड, मखना, नमकीन, मिठाई अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.नवरात्रीच्या उपवासात अनेकजण घरी करण्यापेक्षा बाहेरच्या पॅक फूडकडे आपली पसंती दाखवतात.या प्रकारचे पॅकबंद खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही आणि ते खाल्ल्याने वजनही झपाट्याने वाढते.

याकडेही लक्ष द्या

- उपवास करताना जास्त पाणी न पिणे ही सर्वात मोठी चूक आहे. बाहेरच्या पॅक केलेल्या ज्यूसमध्ये केमिकल्स असतात, ते टाळावे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी ताज्या फळांचा ज्यूस करून पिऊ शकता.

-नवरात्रीमध्ये उपवास करताना खाण्याचे अनेक पर्याय आहेत, पण या काळात आरोग्याची काळजी घेत ते पदार्थ खा. जसे की, केळीचे किंवा बटाट्याचे चिप्स ह्यात भरपूर तेल असते.

-दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री अति खाण्याची चूक करू नका. यामुळे पचन बिघडते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT