navratri festival  esakal
नवरात्र

Navratri 2022 : व्रत करण्याआधी जाणून घ्या हे नियम; नाहीतर कराल पश्चाताप!

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यानुसार उपवासाच्या बदलतात प्रथा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्वत्र आज घटस्थापना उत्साहात साजरी केली जात आहे. घटस्थापनेसाठी मुहूर्तावर घरात घट बसवले जातात. आजच्या दिवशी अनेक मंडपात दुर्गामाता विराजमान होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक लोक व्रत करतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यानुसार उपवासाच्या प्रथा बदलतात. काही ठिकाणी खिचडी, फळे खातात तर काही ठिकाणी वरीचा भात खातात. जसे, पदार्थ बदलतात तसे व्रत काळात पाळायचे नियमही बदलतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या नको, याबद्दल पुरांणांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन केले तरच आपल्याला व्रताचा फायदा होईल अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल.नवरात्रीचे व्रत करताना ब्रह्मचार्याचे पालन करावे. व्रताच्या काळात तन आणि मनाने शुद्ध होऊन दुर्गा मातेची सेवा करावी.

नऊही दिवस देवाची शास्त्रशुद्ध पूजा करावी. सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. नऊ दिवस व्रतस्थ राहण्याचा अर्थ आध्यात्मिक साधना करणे असा आहे. या नऊ दिवसात कोणतेही वाईट काम करू नये. तसा विचार देखील करू नये. याकाळात चोरी, खोटे बोलणे, क्रोध, लोभ मत्सर करू नये. व्रतामध्ये मन शांत ठेवावे कोणाशीही वाईट वागू नये.

मुलींना दुर्गामातेचे स्वरूप मानले जाते. नवरात्रीत कन्या पूजनही केले जाते. त्यामुळे कोणत्याही स्त्रीला अपमानास्पद वागणूक देऊ नये. केवळ नवरात्रीच नव्हे तर इतर दिवशीही महिलांचा आदर केला पाहिजे.नवरात्रीत सर्वत्र जगदंबेचा वावर असतो. ती कधीही कोणत्याही रूपात तूमच्या समोर येऊ शकते. त्यामुळे या दिवसात मांसाहार आणि मद्यपान यापासून चार हात लांब रहावे.

आपल्याकडे एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे. लोक उपवासात जास्त खातात असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवावे. नवरात्रीच्या काळात काही नियमांचे पालन करावे लागते. व्रत केले असल्यास केस आणि नखे कापू नयेत. या दिवसात दाढी करू नये, असे सांगण्यात येते.

आजारी असल्यास नवरात्रीचे उपवास करू नयेत. मासिक पाळीतही उपवास करू नयेत. नवरात्रीत संपूर्ण नऊ दिवस उपवास करावा. नवमी किंवा अष्टमीच्या दिवशी कन्यांना जेवायला घालून मगच उपवास सोडावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT