navratri
navratri sakal
नवरात्र

Navratri : यंदा दुर्गामाता मूर्तींच्या किमतीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : वाढत्या महागाईच्या झळा यंदा ‘दुर्गे’लाही बसल्या आहेत. नवरात्रोत्सव जवळ आला असल्याने मूर्तिकार देवीच्या मूर्ती तयार करण्यात रात्रंदिवस मग्न आहेत. पण, वाढत्या महागाईमुळे यंदा गतवर्षीपेक्षा मूर्तीच्या किमतीत दीडपट वाढ झाली आहे.

हिंगोली शहरातील गवळीपुऱ्यातील कारागीर गणेशोत्सव, महालक्ष्मी, दुर्गा महोत्सव, दीपावलीत लागणाऱ्या पणत्यांसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या देवीच्या मूर्ती तयार करतात. अनेक कुटुंबीयांचा हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. गणेशोत्सव संपताच मूर्तिकार दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यास सुरवात करतात. कोरोना काळात दोन वर्षे हा व्यवसाय अडचणीत होता. यावर्षी मात्र सर्व सण- उत्सव साजरे करण्यास परवानगी असल्याने यावर्षी नवरात्रोत्सव आनंदाने साजरा होणार आहे. त्या प्रमाणे देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी आॅर्डर देखील मिळाल्याचे कारागीर सांगत आहेत. सोमवारपासून नवरात्रोत्सव सुरू होणार असून, या दिवशी घटस्थापना होणार आहे.

शहरासह अनेक ठिकाणांवरून मूर्तीच्या ऑर्डर मिळाल्याचे ज्ञानेश्वर पेरियार, राजेश पेरियार यांनी सांगितले. त्यांचा वडिलोपार्जित मूर्ती तयार करण्याचा साठ वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. वडिलांकडून मूर्ती तयार करण्याचे धडे त्यांनी गिरविले, नवरात्र महोत्सवासाठी जवळपास पाचशे लहान- मोठ्या मूर्ती त्यांनी विक्रीसाठी तयार केल्या आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी राजस्थान येथून प्लास्टर ऑफ पॅरिस विकत आणावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिडशे रुपयांना मिळणारी प्लास्टर ऑफ पॅरिसची पंधरा किलोंची बॅग यावर्षी १८०-९० रुपयांपर्यंत मिळते. पूर्वी एक हजार रुपयांना मिळणार दहा किलो रंगाची बकेट आता सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे मूर्तीची भाववाढ अपरिहार्य आहे. हजारांपासून ते पंधरा हजारांपर्यंत मूर्तीचे दर असून, तीन फुटांपासून दहा फुटांपर्यंतच् मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. ऑर्डरप्रमाणे मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यात अष्टभुजा, दुर्गादेवी, तुळजाभवानी, रेणुकामाता, चंडिका, अंबिका, सप्तशृंगी आदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT