नवरात्र

करवीर निवासिनी अंबाबाईची महालक्ष्मी रूपात पूजा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (रविवारी) अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा जागर होणार असून देवी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. रात्री साडेनऊला या सोहळ्याला प्रारंभ होईल.

मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली. दुपारी गर्दी कमी राहिली. मात्र, सायंकाळी चारनंतर पुन्हा गर्दी वाढली. ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांच्यासह धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रात्री साडेनऊ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला. मंदिरातील दोन्ही वैद्यकीय मदत केंद्रात आजअखेर तीन हजारहून अधिक भाविकांनी तपासणी व औषधोपचार घेतले.

‘महालक्ष्मी’ पूजेविषयी...

आदी शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्रांमधून अंबाबाईची करुणा भाकली आहे. या स्तोत्रामध्ये त्यांनी लक्ष्मीलाच कधी सरस्वती, तर कधी पार्वती मानले आहे. कनकधारा म्हणजे सोन्याचा वर्षाव. जिचा निवास कमळ असून, जिने हातामध्ये कमळ धारण केले आहे. जिने लखलखीत वस्त्रे आणि पुष्पमाला परिधान केल्या आहेत. जिने हरी म्हणजे विष्णूचे मन जिंकले आहे, अशी ती त्रिभुवनाला सांभाळणारी लक्ष्मी माझ्यावरही प्रसन्न होऊ दे, असे या पूजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मंदार मुनीश्‍वर, आशुतोष ठाणेकर, केदार मुनीश्‍वर यांनी सांगितले.

प्रतिभा थोरात यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रसिद्ध गायिका प्रतिभा थोरात यांच्या ‘भावभक्ती स्वरबहार’ या मैफलीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासह संग्राम पाटील यांनी मैफलीतून विविध भाव-भक्तिगीते सादर केली. प्रिया लांजेकर यांचे निवेदन, तर अमित कुलकर्णी, सुरेश कदम, राजू चौंडकर, प्रफुल्ल शेंडगे यांची संगीत साथ होती. 

ऑनलाईन दर्शन ४० लाखांवर
देवस्थान समितीच्या अंबाबाई दर्शन लाईव्ह ॲपच्या माध्यमातून सात दिवसांत ४० लाखांहून अधिक जणांनी ऑनलाईन दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT