navratri recipe esakal
नवरात्र

Navratri Food : यंदाच्या नवरात्रीत उपवासाला ट्राय करा ‘अरबी कोफ्ते’

उपवासाच्या दिवसात ९ दिवस काय वेगळं करायचं हा प्रश्न गृहीणींसमोर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लवकरच नवरात्रीला सुरवात होणार असून त्यासाठीची तयारी उत्सहात सुरू आहे. हिंदू संस्कृतीत नवरात्रीत नऊ दिवस उपवास केला जातो. काही ठिकाणी कडक तर काही ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवसात ९ दिवस काय वेगळं करायचं हा प्रश्न गृहीणींसमोर असतो.

सतत साबूदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो. तर साबूदान्याचे प्रकार खाऊन पित्त होतं. त्यामुळे वेगळ काय करायचं हा प्रश्न असतो. आज नवरात्रीत करता येईल अशी एक खास रेसिपी पाहुयात. या रेसिपीचे नाव अरबी कोफ्ता असून ती बनवायला एकदम सोपी आणि पौष्टीक आहे. अरबी म्हणजे अळूच्या मुंडल्या हा एक कंदमुळाचा प्रकार आहे. अळूच्या मुंडल्याची भाजी अरबीची भाजी म्हणून ओळखली जाते.

अरबी कोफ्ता बनवण्यासाठी साहित्य-

अरबी (अळुच्या मुंडल्या) 250 ग्रॅम, गव्हाचे पीठ 3 टीस्पून, हिरवी मिरची १, अर्धा इंच आले, ओवा 1 टीस्पून, सैंधव मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

अरबी कोफ्तासोबतची चटणीचे साहीत्य

पुदीना पाने,दही 100 ग्रॅम,काकडी 50 ग्रॅम,

अरबी कोफ्ता कृती

कोफ्ते बनवण्यासाठी प्रथम अरबी उकडून त्याची साल काढून घ्या.

त्यानंतर त्यात गव्हाचे पीठ, हिरवी मिरची,आले, ओवा आणि सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.

तळहाताला तेल लावून मिश्रणातील छोटा गोळा घेऊन कोफ्ते बनवून घ्या.

कोफ्ते तुम्हाला आवडतीन त्या आकारात बनवा.

कढईत थोड्या तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

चटणी

प्रथम दह्यातील पाणी काढण्यासाठी ते एका कापडात बांधून ठेवा. पुदिन्याची पाने आणि काकडी बारीक कापून दह्यात मिसळा. चवीसाठी साखर किंवा मिठ घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT