navratri festival  esakal
नवरात्र

Navratri 2022 : पहिली नवदुर्गा दत्त भिक्षालींग मंदिरातील ‘एकांबिका’

महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे

Pooja Karande-Kadam

पुणे : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवींची वेगवेगळ्या रूपात पूजा आरती,अभिषेक केला जातो. संपूर्ण भारतात देवींची अनेक शक्तीस्थळे आहेत. या नवरात्रात भाविक देवींच्या विविध स्थळांना भेटी देऊन मनोभावे पूजा-अर्चना करतात.

महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठे आहेत. यातील अंबाबाई मंदिरासोबतच कोल्हापूर परिसरात देवींची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. आज या नवदुर्गांपैकी पहिली एकांबिका म्हणजेच एकविरा मातेबद्दल जाणून घेऊया...

अंबाबाई मंदिरातही शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक गर्दी करतात. कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनाबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (मुकांबा देवी), पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.

करवीर महात्म्यातील उल्लेखानुसार, नवदुर्गा ह्या माता लक्ष्मी आणि माता पार्वती देवींच्या स्वरूपीनी आहेत. करवीर संस्थानच्या रक्षणासाठी जगदंबा मातेचे नऊ विभुतींमध्ये रूपांतर झाले. त्याच या नवदुर्गा होय. कोल्हापुरात आझाद चौकातील कॉमर्स कॉलेजजवळ एकांबिका म्हणजेच एकविरा मातेचे मंदिर आहे.

या मंदिरात देवीचा गाभारा आणि सभामंडप वेगवेगळे आहेत. देवीची ही मुर्ती स्वयंभु असून साधारण २५० ते ३०० वर्षापूर्वी देवीच्या मुर्तीवर मुखवटा लावण्यात आला आहे. मंदिरात दररोज पूजा आरती होते. एकविरा, रेणुका, यल्लमा अशी या देवीची इतर नावे आहेत. या मंदिर आवारातच श्री दत्त महाराजांचे ‘दत्त भिक्षालींग मंदिर’ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT