Navratri Special Bhagar Tikki Esakal
नवरात्र

Navratri Recipe: नवरात्र स्पेशल भगर टिक्की कशा तयार करायच्या?

साधी भगर फोडणी देण्यापेक्षा तुम्ही त्यापासून टेस्टी टिक्की बनवू शकता

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी करत आहोत. बहुतेक लोक नवरात्रीचा उपवासात विविध पदार्थ बनवतात. साधी भगर फोडणी देण्यापेक्षा तुम्ही त्यापासून टेस्टी टिक्की बनवू शकता. ते तुम्ही उपवासाची चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कसे तयार करायचे भगरची टिक्की?

साहित्य

भगर

उकडलेले बटाटे

आलं

हिरवी मिरची

शेंगदाणे

जिरे

काळी मिरी पावडर

सैंधव मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम भगर  पाण्याने स्वच्छ धुवून काढावी आणि नंतर मग ती कुकरमध्ये शिजवून घ्यावी. एका शिट्टीत ही भगर मस्त शिजते. तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यावे आणि बारीक करुन घ्या. आता कुकर थंड झाला असेल, त्यातून भगर एका भांड्यात काढून घ्या. आता त्यात उकडलेले बटाटे घाला. आता आले किसून घ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. तुम्ही उपवासात कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा टाकू शकता. आता या गोष्टी नीट मिक्स करा. टिक्की बनवण्याचा मसाला तयार आहे.आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तोपर्यंत हाताला थोडे तेल लावून बटाट्याच्या मसाला घालून सर्व टिक्की बनवा. आता तेल गरम झाल्यावर आता एकावेळी ३ ते ४ टिक्की तळून घ्या. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्या. लक्षात ठेवा हे मोठ्या फ्लेमवर नाही तर मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर तळा. नंतर उपवासाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. जर तुम्हाला जास्त तळलेले खावेसे वाटत नसेल, तर तुम्ही पॅनमध्ये कमी तेपात टिक्की शॅलो फ्राय करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT