Navratri special beat halawa Esakal
नवरात्र

Navratri Recipe : नवरात्र स्पेशल घरच्या घरी तयार करा बीटाचा हलवा

साधारणतः 20 मिनिटांनी हलवा खाण्यासाठी तयार होईल

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. बहुतेक लोक नवरात्रीचा उपवासात विविध पदार्थ बनवतात. चला तर मग आज आपण नवरात्र स्पेशल घरच्या घरी तयार करा बीटाचा हलवा याची रेसिपी पाहू या.

साहित्य :

मध्यम आकाराचे दोनबीट  

तिन चमचे तूप

अर्धा वाटी साखर 

काजू बदाम तुकडे

दुध एक वाटी

मनुके 

कृती :

बीट चांगले धुवून साल काढून किसून घ्या. पॅन गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप टाका. तूप विरघळल्यावर त्यामध्ये बारिक तुकडे केलेले बदाम आणि काजू टाकून भाजून घ्या. भाजलेला सुका मेवा प्लेटमध्ये काढून घ्या. पॅनमध्ये 1 चमचा तूप टाका. त्यानंतर त्यामध्ये बारिक किसलेलं बीट टाका. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्या. 3 मिनिटांपर्यंत शिजवल्यानंतर त्यामध्ये दूध घालून मिक्स करा. त्यावर झाकण ठेवून मध्येम आचेवर शिजवून घ्या. झाकण काढून थोडा वेळ मध्यम आचेवर हलवा शिजवून घ्या. यादरम्यान हलवा घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. बीटाचं मिश्रण नरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर एकत्र करा. त्यामध्ये मनुके टाका. साखर वितळून मिश्रण एकजीव होईपर्यंत एकजीव करत रहा. मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये सुका मेवा टाका, वेलचीची पूड टाकून मिक्स करून घ्या. साधारणतः 20 मिनिटांनी हलवा खाण्यासाठी तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT