Ambabai Temple Karveer Kolhapur esakal
नवरात्र

Navratri Festival : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात दर्शन रांग वाढवणार, समितीकडून जय्यत तयारी

नवरात्रोत्सवात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर दर्शन रांग वाढविण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती भाविकांना विविध सोयी - सुविधा देण्यासाठी महिनाभर आधीच नियोजन करत असते.

कोल्हापूर : नवरात्रोत्सव जवळ (Navratri Festival) आल्याने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple) विकासकामांना गती आली आहे. नवरात्रोत्सवात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर दर्शन रांग वाढविण्यात आली आहे. त्यासाठीचे काही बॅरेकेडिंग लावण्यात आले असले तरी अद्यापही काही बाकी आहेत.

पुढील दोन - चार दिवसांत बॅरेकेडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरूवात होणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात भाविक विक्रमी गर्दी करतात. त्या पार्श्‍वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती भाविकांना विविध सोयी - सुविधा देण्यासाठी महिनाभर आधीच नियोजन करत असते. यंदाही मंदिरातील विविध विकासकामे पूर्णत्वास आली असून काही कामे पूर्णही झाली आहेत.

विद्यापीठ दरवाजासमोर चप्पल स्टँड उभारले आहे. विद्युत वाहिन्या भुमिगत केल्या असून त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात मंदिराचे सौंदर्य अधिक खुलणार आहे. त्यासोबत महिला व पुरूष भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पागा बिल्डिंगमध्ये स्वच्छतागृहही खुले केले आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधाही मंदिर परिसरात केली आहे.

बिंदू चौकात एलईडी वॉल

भाविकांना श्री अंबाबाईचे दर्शन घेता यावे, यासाठी परिसरासह बिंदू चौकात एलईडी वॉल उभ्या करण्यात येणार आहेत. त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले असून बिंदू चौकात विद्युत विजेची जोडणी मिळाल्यानंतर येथेही भव्य एलईडी वॉल उभारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT