Python Snake Found in Walwa esakal
पश्चिम महाराष्ट्र

वाळव्याच्या इतिहासात पहिलीच घटना! बैलगाडा शर्यतीच्या मैदान परिसरात पेरूच्या झाडावर आढळला 10 फुटांचा अजगर

वन विभागाने घटनास्थळी धाव घेत अजगराला ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी करून त्याला अधिवासात सोडणार असल्याचं सांगितलं.

विजय लोहार

वाळवा तालुक्यात हा सर्प आढळणारी पहिलीच घटना असून हा सर्प आठ ते दहा वर्षांचा असावा, असा अंदाज वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नेर्ले (सांगली) : वाळवा तालुक्यात (Walwa Sangli) पेठ हद्दीतील 'हॉटेल मनिकंडण'च्या पाठीमागे बैलगाडा शर्यतीच्या मैदान परिसरात काल (शनिवार) रात्री साडेबाराच्या सुमारास तब्बल आठ ते दहा फुटाचा अजगर जातीचा सर्प (Python Snake) आढळून आला. वाळवा तालुक्यात हा सर्प आढळणारी पहिलीच घटना असून हा सर्प आठ ते दहा वर्षांचा असावा, असा अंदाज वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

वन विभागाने घटनास्थळी धाव घेत अजगराला ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी करून त्याला अधिवासात सोडणार असल्याचं सांगितलं. वन विभागाने दिलेली माहिती अशी, वाळवा येथील पश्चिमेला आशियाई महामार्गावरती मनिकंडण नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागे बैलगाड्यांच्या शर्यती घेतल्या जातात. याच मैदानाच्या एका पेरुच्या झाडावरती अजगर जातीचा सर्प रात्रीच्या वेळेस एका व्यक्तीला दिसून आला.

हा सर्प मांजराच्या पाठीमागे लागत मांजर झाडावर चढल्यानंतर त्याच्या पाठीमागून झाडावर चढला असावा, असा अंदाज आहे. पेरूचे झाड का हालत असल्याचे पाहून यावेळी संबंधित व्यक्तीने याबाबत इस्लामपूर पोलिसांना माहिती दिली. इस्लामपूर पोलिसांनी तात्काळ वन विभागाचे बावची विभागाचे वनरक्षक भीवा कोळेकर यांना कळवले.

यावेळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम प्राणिमित्र युनूस मणेर, वनरक्षक राडे, विशाल दुबल व वन विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी त्या अजगरास रेस्क्यू करून त्याची वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वंजारी यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. त्याला अधिवासात सोडण्यात येणार आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व सर्पमित्रांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं वन विभागाचं कौतुक होत आहे.

परिसरात असे दुर्मिळ साप आढळत आहेत. त्यामुळं वनविभाग अधिकारी आणि प्राणी-सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी. आढळलेले अजगर हे शारीरिक दृष्टीने उत्तम असून त्याला निसर्गाच्या अधिवासात सोडणार असल्याचे वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

अजगर आढळल्याने घाबरू नका

परिसरात विविध जातीचे सर्प आढळतात, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. याबाबत वनविभाग किंवा सर्प मित्रांना फोन करावा व माहिती द्यावी. याबाबत मो. ९८२२३४९६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

-युनूस मणेर, प्राणी मित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळांविरोधात नागपूर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

Railway Accident: रुळावर होणारे अपघात टळणार, रेल्वेचा मोठा निर्णय, ११९ कोटींचा प्रकल्प हाती; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT