crime news sakal
पश्चिम महाराष्ट्र

Nipani : गायकवाडीत दहा तोळे सोने लंपास; १.४० लाख रोकडवर डल्ला

गायकवाडी येथील लक्ष्मी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली असून त्यातील ४ ते ५ हजार रुपये हस्तगत केल्याची शक्यता वर्तवली जात आहे

सकाळ वृत्तसेवा

कोडणी : गायकवाडी (ता. निपाणी) येथे बुधवारी (ता. १) मध्यरात्री चोरट्यांनी लक्ष्मी मंदिरातील दानपेटीसह मेढपाळांची चार कुलूपबंद घरे फोडली. त्यात १० तोळे सोने व १ लाख ४० रोकड लंपास करून डल्ला मारला. गुरुवारी (ता. २) सकाळी ही घटना उघडकीस आली. तसेच अन्य ३ ठिकाणीही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. या धाडसी चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री कुलूपबंद घरांना लक्ष्य केले. यावेळी सोमा बाबू रेवडे यांच्या घरातील ५ हजार रोकड व २ तोळे सोने, विठ्ठल कुणाप्पा डोणे यांच्या घरातील ३० हजार रोकड व अर्धा तोळे सोने, लक्ष्मण कुशाप्पा लांडगे यांच्या घरातील ५० हजार रोख व एक तोळे सोने आणि अवघडी बिरू अनुसे यांच्या घरातील तिजोरी फोडून 50 हजाराची रोकड व सहा तोळे सोने असा मुद्देमाल चोरट्यांनी हस्तगत केला आहे. चोरी झालेली सर्व कुटुंबे मेंढपाळ आहेत. कुटूबांतील सर्व सदस्य घरांना कुलूप लावून बकऱ्यांच्या कळपात गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. गुरुवारी दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी चोरी झाल्याची माहिती या कुटुंबांना दिल्यानंतर माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दानपेटी फोडून ओढ्यानजिक टाकली

गायकवाडी येथील लक्ष्मी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली असून त्यातील ४ ते ५ हजार रुपये हस्तगत केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही दानपेटी फोडून चोरट्यांनी ओढ्यानजिक टाकून दिल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. तसेच येथील बिरदेव बकरी सोसायटी या ठिकाणीही चोरट्यांनी कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र सोसायटीत लाॅकर असल्यामुळे चोरट्यांना चोरीचा डाव साधता आला नाही.

चोरट्यांनी नेमकी संधी साधली

बुधवारी रात्रभर गायकवाडीत वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच रात्रभर जोरदार पाऊस सुद्धा सुरू होता. त्यामुळे चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधून चोरीचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गायकवाडी येथे यापूर्वीही चोरट्यांनी मेंढपाळांच्या कुलूपबंद घरांना लक्ष केले होते. त्यामुळे आता नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT