105 corona-free in the district; New patients per day 29
105 corona-free in the district; New patients per day 29 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात 105 कोरोनामुक्त ; दिवसात नवे रुग्ण 29

शैलेश पेटकर

सांगली : जिल्ह्यात आज 105 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसात 29 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांत बाधितांची आकडेवारी कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात चार जणांना बाधा झाली. एकूण बाधित 46 हजार 093 झाले. 436 जणांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दिवसभरात 124 आरटीपीसीआर तपासण्यात 15 बाधित आढळले. 693 रॅपीड अँटिजेन तपासण्यात 14 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आटपाडी तालुक्‍यात 3, जतला 8, कवठेमहांकाळ 2, खानापूर 3, मिरज 1, पलूस 1, तासगाव 7 जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात नवे 4 रुग्ण सापडलेत. 

सांगलीत 3 आणि मिरजेत 1 रुग्ण आढळले. पलूस, तासगाव आणि महापालिका क्षेत्रातील प्रत्येकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत 244 जण गृहअलगीकरणात आहेत. 63 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 17, हायफ्लो नेझल ऑक्‍सिजनवर 9 रुग्ण, तर इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर 1 आहेत. 

आजचे बाधित ः 29 
उपचाराखाली ः 436 
बरे झालेले ः 43978 
एकूण मृत्यू ः 1679 
एकूण बाधित ः 46093 
चिंताजनक ः 90 
ग्रामीण बाधित ः 23112 
शहरी बाधित ः 6810 
मनपा क्षेत्र ः 16171 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT