पश्चिम महाराष्ट्र

कौतुकास्पद! 11 दिवसांच्या चिमुकलीची आई कोरोनाबाधित; मैत्रिणीने दिली मायेची ऊब

नवजात बाळाला ऐश्वर्या यांनी दिले आईचे प्रेम

संतोष कणसे

कडेगाव (सांगली) : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात माणुसकी लोप पावत आहे की काय, अशी भीती व्यक्त होत असताना कडेगाव येथील एक विवाहिता ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ या आपल्या शेजारच्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाचा अकराव्या दिवसापासून सांभाळ करीत आहेत. नवजात बाळाला त्यांनी मातेचे प्रेम दिले आहे; ऐश्वर्या यांनी जपलेल्या माणुसकीला कडेगावकरांनी सलाम ठोकला आहे.

कडेगाव शहरांतील आझाद चौकात ऐश्वर्या वेल्हाळ आपल्या कुटुंबीयासोबत राहतात, तर त्यांच्या शेजारी राहात असलेल्या एका कुटुंबातील पाचपैंकी बाळाच्या मातेसह तिघांना कोरोनाची लागण झाली. संबंधित बाळाची माता ही कोरोनाबाधित असतानाच त्यांना कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कन्यारत्न झाले. बाळाचीही तब्येत काहीशी नाजूक असल्याने संबंधित नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस काचेमध्ये ठेवले. त्यानंतर संबंधित मातेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी डॉक्‍टरांनी बाळाला कोरोनाबाधित मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळाच्या मातेने आपल्या शेजारी राहात असलेली मैत्रीण ऐश्वर्या वेल्हाळ यांना आपल्या बाळाचा सांभाळ करण्याबाबत विनंती केली. ऐश्वर्या यांनी कसलाही विचार न करता अकराव्या दिवसाच्या बाळाचा सांभाळ करण्याचे मान्य केले.

त्यांना पती अनिकेत व सासरे बाळासाहेब वेल्हाळ यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली. अशारीतीने ऐश्वर्या या संबंधित बाळाचा अकराव्या दिवसापासून ते आज वीस दिवस झाले सांभाळ करीत आहेत. त्या बाळाला दररोज न्हाऊ-खाऊ घालत त्याला मातेचे प्रेम दिले आहे. त्याची किरकोळ आरोग्याची तक्रार निर्माण झाली तरी त्याला दवाखान्यात नेणे, औषधोपचार करणे सर्वकाही त्या करीत आहेत. त्यांच्या मायेच्या व प्रेमाच्या सावलीत बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे. संकटसमयी ऐश्वर्या यांनी घालून दिलेला हा आदर्श सर्वांना निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

"कोरोना काळात सर्वांनी माणुसकी जपली पाहिजे. ज्या घरातील लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत केली पाहिजे. याच विचाराने मीही कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाची अकराव्या दिवसापासून माझी स्वतःची मुलगी समजून सांभाळ करीत आहे."

- ऐश्वर्या वेल्हाळ, कडेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT