12 high-tech nurseries in the district; Atpadi three 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात 12 हायटेक रोपवाटिका; आटपाडीत तीन

नागेश गायकवाड

आटपाडी : राज्य शासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून फळ आणि भाजीपाल्याची शेडनेट आणि पाडेल टनेल हाऊस रोपवाटिका 50 टक्के अनुदानावर उभा करण्यासाठी जिल्ह्यात बारा प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यातील तीन प्रस्ताव आटपाडीचे आहेत. आटपाडी तालुक्‍यात पहिल्यांदाच 50 टक्के अनुदानावर हायटेक रोपवाटिका उभा राहणार आहेत. तालुक्‍यातील रोपवाटिकांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फळे, भाजीपाल्याची रोपे तालुक्‍यातच उपलब्ध होणार आहेत. 

राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून जिल्ह्यासाठी 50 टक्के अनुदानावर रोपवाटिका उभारण्यासाठी 12 रोपवाटिकांचे उद्दिष्ट जिल्हा कृषी विभागाला दिले होते. जिल्हा कृषी विभागाने प्रत्येक तालुका कृषी कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आटपाडीतील मांडणी केलेल्या तिन्ही प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यातील एक रोपवाटिका पूर्ण तयार झाली आहे. 

योजनेतील रोपवाटिकेचे अंदाजपत्रक चार लाख 60 हजार आहे. 50 टक्के प्रमाणे दोन लाख 30 हजार अनुदान दिले जाणार आहे. त्यातून दहा गुंठे शेड-नेट, दहा गुंठे पाडली टनेल हाऊस दहा गुंठे याची उभारणी केली जाणार आहे. उभारणीनंतर 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे. प्रत्यक्ष रोपांची विक्री सुरू झाल्यानंतर उर्वरित 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे. 

कामे अंतिम टप्प्यात 
एका रोपवाटिकेला तीन महिन्यांपूर्वी तर अन्य दोन रोपवाटिकांला एक महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली. एका रोपवाटिकेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित आटपाडीसह जिल्ह्यातील सर्व रोपवाटिकांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या रोपवाटिका उभारल्यानंतर शेतकऱ्यांना फळबागा, भाजीपाल्याची रोपांची याच भागात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला रोपांसाठी बाहेर जावे लागत होते. रोपवाटीकामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT