gas.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

प्रधानमंत्री उज्वला' तून जिल्ह्यासाठी मिळाले 12.22 कोटी अनुदान 

सकाळवृत्तसेवा

सांगली,  ः "कोरोना' च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. या योजने अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर देण्यात येत आहेत.

संचारबंदीतील स्थितीला आर्थिक झळ कमी बसावी म्हणून शासनाने गरीब व आरोग्य सेवा कामगारांसह प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 1 एप्रिल ते 30 जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत एलपीजी गॅस सिंलेडर देण्याची तरतूद केली. जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 177 लाभार्थीपैकी 1 लाख 11 हजार 809 लाभार्थींना या योजनेचा लाभ घेतला आहे. एक एप्रिलपासून मेअखेर 1 लाख 61 हजार सिलिडर मोफत वाटली असून त्यासाठी 12.22 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. 
योजने अंतर्गत उज्वला ग्राहकांच्या बॅंक खात्यात दरमहिन्याच्या 14.2 किलो रिफिलच्या किंमतीएवढी आगाऊ रक्कम जमा करण्यात येते. महिन्याला एक प्रमाणे तीन रिफीलची तरतूद आहे. ज्या ग्राहकांकडे 5 किलोचे सिलेंडर आहे त्यांना महिन्याला 3 तर योजनेच्या अवधीत फक्त 8 रिफिलची तरतूद आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्याकडील रक्कमेतून सिलेंडर घेतला नाही तर त्यांना पुढील महिन्यात आगाऊ रक्कम मिळत नाही. आगाऊ रक्कम मिळण्यासाठी ग्राहकांने बॅंक खाते सुरू असण्याबाबत खात्री करणे आवश्‍यक आहे. ज्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम मिळाली नाही, त्यांनी गॅस वितरकांशी संपर्क साधावा किंवा ऑइल कंपनीच्या हेल्पलाईन- एच पी गॅस, इंडेन गॅस 18002333555, भारत गॅस 1800224344 क्रमांकावर संपर्क साधावा. आधार लिंक न झाल्याबाबतची कारणे जाणून त्याबाबत बॅंकेत जावून सुधारणा करून घ्यावी. 
 
 
कंपनीचे नाव, लाभार्थी, अनुदान ( कोटी), सिलिंडर संख्या 
एसपीसी, 53583, 5.74, 73152 
बीपीसी, 38500, 4.45, 62481 
आयओसी, 19726, 2.03, 25305 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT