13 more charged in Borgaon murder case
13 more charged in Borgaon murder case 
पश्चिम महाराष्ट्र

"बोरगाव'प्रकरणी आणखी 13 जणांवर गुन्हे दाखल; जमावबंदी कायम

शम्मु मुल्ला

शिरढोण (जि. सांगली) ः बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील राडाप्रकरणी काल 39 जणांच्या विरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल होता. त्यात आता आणखी 13 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यासाठीची फिर्याद गंभीर जखमी झालेले प्रकाश वसंत पाटील (वय 36) यांनी दिली आहे. 

तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष व बोरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गणपती नामदेव पाटील यांच्यासह 13 जण व इतर अनोळखी 15 ते 20 व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. श्री. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर पद्धतीने जमाव जमला होता.

उपसरपंच निवडणुकीच्या कारणावरून प्रकाश वसंत पाटील व तुकाराम उत्तम पाटील यांना अमोल वसंत पाटील, किरण नामदेव पाटील, श्रीकांत भाऊसो पाटील यांनी काठ्यांनी डोक्‍यात पाठीमागील बाजूस व हातावर मारले; तर राजेश रामचंद्र पाटील याने ढकलून खाली पाडले. तसेच वसंत विष्णू पाटील व राहुल भानूदास पाटील या दोघांनी लाथाबुक्‍यांनी मारहाण केली.

माधवराव विष्णू पाटील याने काठीने तुकाराम पाटील याच्या हनुवटीवर मारले. सुबराव विठ्ठल पाटील, अनिल शंकर परीट, विशाल विजय पाटील, वैभव विजय पाटील व संजय आनंदराव जाधव यांनी तुकाराम पाटील यांना लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या 15 ते 20 लोकांनी पॅनेलच्या सदस्यांना व समर्थकांना शिवीगाळ, दमदाटी केली आणि त्यापैकी काहींनी लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. 

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी ः गणपती नामदेव पाटील, किरण नामदेव पाटील, अमोल वसंत पाटील, श्रीकांत भाऊसो पाटील, राजेश रामचंद्र पाटील, वसंत विष्णू पाटील, राहुल भानूदास पाटील, सुबराव विठ्ठल पाटील, अनिल शंकर परीट, विशाल विजय पाटील, वैभव विजय पाटील, संजय आनंदराव जाधव, माधवराव विष्णू पाटील तसेच त्यांच्यासोबत आलेले इतर 15 ते 20 लोक (सर्व रा. बोरगाव). 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT