133 teachers work as a guest faculty in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अतिथी शिक्षकांची होणार भरती

मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लवरकच 133 अतिथी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर राज्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये 3473 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानूसार बिएडधारकांकडून अर्ज मागिविली जाणार आहेत. 

राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. मात्र शिक्षण खाते रिक्‍त जागा भरण्याऐवजी दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक करुन वेळ मारुन नेत आहे. 2020 मध्ये कोरोनाचे संकट असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लवकर शिक्षक भरती होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून यावेळीही विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी अतिथी शिक्षकांवरच असणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये विविध विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्‍त असून या भरती करणे आवश्‍यक बनले आहे. मात्र शाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आता अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

2020- 21 च्या शैक्षणिक वर्षाकरिता अतिथी शिक्षक भरती होणार असल्याने तीन ते चार महिने नोकरी करण्यासाठी बिएडधारक पुढे येणार का? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. माध्यमिक प्रमाणेच सरकारी शाळांमध्येही शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. मात्र सध्या फक्‍त सरकारी माध्यमिक शाळांमध्येच शिक्षकांच्या जागा भरती केल्या जाणार असून पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्यानंतर प्राथमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यामार्फत देण्यात आली आहे. दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक केली जाते, परंतु त्यांना वेळेत वेतन देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नोकरी करुही वेतनासाठी शिक्षकांना वाट पहावी लागते. 

"सरकारी माध्यमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीसाठी अर्ज मागविण्यात येणार असून 133 जागा शैक्षणिक जिल्ह्यांत भरती केल्या जातील. सध्या फक्‍त माध्यमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला असून प्राथमिक शाळांबाबत निर्णय झालेला नाही."

 - ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT