Pandharpur Maghi Yatra esakal
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Maghi Yatra : पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

भाविकांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर : पंढरपुरातून (Pandharpur) एक धक्कादायक बातमी समोर आलीये. इथं माघी वारी (Maghi Yatra) यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे.

या भाविकांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अचानक भाविकांची प्रकृती बिघडू लागल्याने खळबळ उडाली. सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांचं म्हणणं आहे. पंढरपुरात माघी वारी यात्रेनिमित्त लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथं येत असतात.

पंढरपुरातील आश्रमात अनेक भाविक प्रसाद घेण्यासाठी, तसंच जेवणासाठी येत असतात. येथील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये काल रात्री भाविकांनी भगर, आमटी खाल्ल्यामुळं त्यांना विषबाधा झाली.

यामध्ये 137 भाविकांना त्याची झळ बसली. रात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू जाणवून लागला, त्यामुळं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT