137 model schools in the Sangali district; Prepare a preliminary list 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 137 मॉडेल शाळा; प्राथमिक यादी तयार

अजित झळके

सांगली ः जिल्ह्यातील 137 प्राथमिक शाळांची "मॉडेल स्कूल' उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्याची प्राथमिक यादी तयार आहे. ग्रामपंचायत निवडणूक संपताच त्याची घोषणा केली जाईल. प्रत्येक केंद्रातून एक शाळा निवडली आहे. शासकीय योजना आणि लोकसहभागातून शैक्षणिक विकास चळवळ उभी करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला आहे. त्यासाठी सर्व विभागांना त्यांच्या सहभागाविषयी सूचना दिल्या आहेत. 

जितेंद्र डुडी यांनी पदभार स्विकारतानाच "मी आरोग्य आणि शिक्षण' या विषयावर फोकस करणार आहे, असे जाहीर केले होते. कोरोना संकट काळात त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर काम केले. आता शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्या नियोजनासाठी आज प्रभारी शिक्षणाधिकारी राहूल गावडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे आदींशी चर्चा केली. त्यातून केंद्रनिहाय एकेक याप्रमाणे 137 शाळांची निवड करण्यात आली. या शाळा निवडताना तेथील पटसंख्या समाधानकारक असावी, यावर भर दिला आहे. 

मॉडेल शाळा संकल्पनेत विविध योजनेतून इमारत विकास, इमारत दुरुस्ती, कुंपन भिंती बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, क्रीडांगण सपाटीकरण या भौतिक सुविधांचे नियोजन केले जाईल. शिक्षण विकासासाठी डिजीटल शाळा, ग्रंथालय, आवश्‍यतेनुसार प्रयोगशाळा केल्या जातील. त्यासाठी लोकसहभाग आवश्‍यक आहे.

त्यासाठी लोकांशी संवाद साधला जाईल. वरिष्ठ अधिकारी शाळांना भेट देतील. शिक्षकांना या प्रक्रियेत पूर्ण क्षमतेने कामासाठी आग्रह केला जाईल. हा बदल शिक्षण बदलाची चळवळ म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा श्री. डुडी यांनी व्यक्त केली. 

शिक्षण परिवर्तन चळवळ यातून उभी करूया

प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत आदर्श बदल करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात मला लोकसहभाग हवा आहे. आम्ही शासकीय योजनेतून ताकद देऊ, लोकांनी पुढे येऊन हात द्यावा. एक मोठी शिक्षण परिवर्तन चळवळ यातून उभी करूया. 

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT