पश्चिम महाराष्ट्र

कळंबा कारागृहातील १४ कर्मचारी निलंबित

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - वाई हत्याकांडातील मुख्य संशयित संतोष पोळच्या कळंबा कारागृहातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी आज आणखी १४ कर्मचाऱ्यांना कारागृह विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना निलंबित केले.

कर्तव्यात निष्काळजी व हलगर्जी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या सर्वांची नावे उद्या (ता. ८) प्राप्त होतील. मात्र यात कारागृहातील हवालदार, सुभेदार, सुरक्षारक्षकांचा समावेश असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. 

कळंबा कारागृहात असताना संशयित डॉ. पोळचा २७ नोव्हेंबरला व्हिडिओ व्हायरल झाला. कारागृहातील बॅरॅकमध्ये हातात पिस्तूल घेऊन बिनधास्तपणे इकडून तिकडे फिरतो, खाली बसून पिस्तूल न्याहाळत असल्याचे चित्रीकरण होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने कारागृह विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक साठे कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यात संबंधित पिस्तूल हे बनावट असल्याचे सिद्ध झाले. मात्र, चित्रीकरणासाठी मोबाईलचा वापर करण्यात आला. तो मोबाईल कारागृहात कसा आला, याची चौकशी साठे यांनी केली. याबाबत सुरक्षारक्षक राकेश पवारला निलंबितही करण्यात आले.

डॉ. पोळच्या संपर्कात असणाऱ्या १५ हून अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. याबाबत कर्तव्यात निष्काळजी व हलगर्जी केल्याप्रकरणी १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात सुरक्षारक्षक, सुभेदार, हवालदार आदींचा समावेश आहे. साठे यांच्याकडून निलंबनाच्या आदेशाचे गोपनीय पत्र कारागृहाला पाठविण्यात आले आहे. ते उद्या प्राप्त झाल्यावर १४ निलंबित कर्मचाऱ्यांची नावे स्पष्ट होणार असल्याचे कारागृह अधीक्षक शेळके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : चिपळूण उड्डाणपुलाची आज पाहणी; नागरिकांच्या तक्रारीची दखल, कामाच्या दर्जाबाबत शंका

Land Records: जमीन मालकांसाठी मोठी बातमी! ‘क’ प्रतीवर अक्षांश-रेखांश असल्यास पुन्हा मोजणीची गरज नाही, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT