mahatma fule karj yojana 
पश्चिम महाराष्ट्र

1401 कोटींची कर्जमाफी, सव्वादोन लाख खात्यांवर रक्कम वर्ग 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील दोन लाख 28 हजार 521 कर्जखात्यांवर 1401 कोटी 92 लाख 67 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यांत सर्व जिल्हा सहकारी बॅंकेच्या थकबाकीदारांचा समावेश आहे. कर्जखात्यांवर रकमा जमा होऊ लागल्याने शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे.

बळिराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होत आहे. शासननिर्णय लागू झाल्यापासून जिल्हा प्रशासनाने योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली आहे. जिल्हा बॅंकेच्या शाखा व "आपले सरकार' सेवा केंद्रातील दोन हजार बायोमेट्रिक मशिनद्वारे आधार प्रमाणीकरणाचे काम निरंतर सुरू आहे.

जिल्ह्यातील 1598 गावांतील दोन लाख 38 हजार 233 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे सुरू आहे. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली शासननिर्देशानुसार कर्जमुक्तीची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे. पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. आधार क्रमांक व रकमेविषयीच्या तक्रारींचे निराकरण तहसील व जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत आहे. 
- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

Bangkok Return Youth Death : बँकॉकहून परतलेल्या तरुणाचा शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत मृतदेह; हातात कंडोमचं पाकीट, झाडावर टांगलेले कपडे, तोंडातून येत होता फेस!

सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

SCROLL FOR NEXT