Rohini-Shinde
Rohini-Shinde 
पश्चिम महाराष्ट्र

पायाभूत सुविधांसाठी पंधरा कोटींची तरतूद

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देत पालिकेने अर्थसंकल्पात चौदा कोटी नव्वद लाखांची तरतूद केली आहे. त्यातून वाढीव हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. त्याचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला असून, शहरातील रखडलेल्या योजनांसह नव्या काही योजनांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पालिका स्तरावर प्रयत्न होणार आहेत. 

पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वारूंजी गावच्या हद्दीत अशुद्ध पाण्याचा उपसा करण्यासाठी जॅकवेल घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाकडून तीन कोटींचा निधी उपलब्ध आहे. त्याद्वारे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जल निस्सारणासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातर्फे वाढीव भागासाठी भुयारी गटार योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठीही विशेष तरतूद अर्थ संकल्पात केली आहे. त्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरले जाते. पाण्याचा विसर्ग टेंभू योजनेच्या खालील भागात केला जाणार आहे. त्यामुळे नदी प्रदूषण होणार नाही. त्याचेही काम प्रगतिपथावर आहे.

सार्वजनिक बांधकामांतर्गत शासनाकडून विशेष रस्ता अनुदानातून दोन कोटींचा निधी आला आहे. विस्तारलेलेल्या भागात नागरी सुविधांसाठी तीन कोटी अनुदान मिळाले आहे. त्यात शहरातील अकरा, तर वाढीव भागातील आठ अशा १९ रस्त्यांची कामे होणार आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योनजेंतर्गत २०१७-१८ वर्षाकरिता एक कोटी ८३ लाख व २०१८-१९ वर्षासाठी एक कोटी ७२ लाख अनुदान मिळाले आहे. त्यात विविध कामे सुरू आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंगळवार पेठेतील स्मशानभूमीचे नूतनीकरण व सुधारणांसाठी एक कोटी ५० लाखांची कामांची या वेळी तरतूद केली आहे. दोन कोटी अनुदानातून शनिवार पेठेतील जिव्हेश्वर मंदिरापासून पाटण कॉलनीकडे येण्यासाठी पूल बांधण्याचे काम सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण विकासांतर्गत महिलाचे सबलीकरणास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ३५ लाख रुपयांचे तरतूद केली आहे. चौदाव्या वित्त आयोगातून नुकतेच दोन कोटी ५४ लाख व विशेष रस्ता अनुदान दोन कोटी, सर्वसाधारण रस्ता अनुदान ५० लाख इतके अनुदान मंजूर झाले आहेत. शहर व परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम क्रीडा संकुलातील क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती, इनडोअर गेम्सची सोय केली आहे. स्टेडियममधील सुधारण्यासाठी दोन कोटींचे अनुदान प्राप्त असून, त्यामधून विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.

.... अशी आहे तरतूद 
* पाणीपुरवठ्यासाठी तीन कोटींच्या निधीतून विविध कामे
* विशेष रस्ता अनुदानातून दोन कोटींचा निधी 
* विस्तारलेलेल्या भागात नागरी सुविधांसाठी तीन कोटी
* शहरातील अकरा, तर वाढीव भागातील आठ अशा १९ रस्त्यांसाठी तरतूद
* अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योनजेंतर्गत साडेतीन कोटींची तरतूद
* स्मशानभूमीचे नूतनीकरण व सुधारणासाठी एक कोटी ५० लाखांची तरतूद
* शनिवार पेठेतील जिव्हेश्वर मंदिर ते पाटण कॉलनीकडील पुलासाठी दोन कोटी तरतूद
* महिला सबलीकरणासाठी ३५ लाखांची तरतूद
* चौदाव्या वित्त आयोगातून नुकतेच दोन कोटी ५४ लाख
* सर्वसाधारण रस्ता अनुदान ५० लाखांची तरतूद
* स्टेडियममधील सुधारण्यासाठी दोन कोटींचे अनुदान

पालिकेचा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे. त्यात विशेष करून नागरिकांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. त्या सुविधा सक्षमपणे राबविण्यासाठी पालिका तत्पर राहणार आहे. वाढीव हद्दवाढीसह शहरातील भागात त्या सुविधा पोचविल्या जातील.  
- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड पालिका.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT