1.5 crore for Rajpath Infrastructure Chief Minister's Fund
1.5 crore for Rajpath Infrastructure Chief Minister's Fund 
पश्चिम महाराष्ट्र

"राजपथ इन्फ्रास्ट्रक्‍चर'ची राजेशाही मदत, मुख्यमंत्री निधीसाठी दिले दीड कोटी

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : कोरोनाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "पीएम केअर फंडा'स मदतीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देऊन पुणे येथील उद्योजक जगदीश लक्ष्मणराव कदम यांनी आपल्या "राजपथ इन्फ्रास्ट्रक्‍चर' कंपनीतर्फे केंद्र व राज्य सरकारला मिळून दीड कोटी रुपयांचा मदतनिधी आज दिला. 

उद्योजक जगदीश व मोहना कदम या उभयतांनी मदतीचे धनादेश आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सुपूर्द केले. "राजपथ इन्फ्रास्ट्रक्‍चर'तर्फे "पीएम केअर फंडा'साठी एक कोटी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी 50 लाख रुपये आणि कंपनीच्या राज्यातील व परराज्यांतील तेराशे कामगारांच्या तीन दिवसांच्या वेतनाचे मिळून 16 लाख 12 हजार 400 रुपये, असे तीन धनादेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. 
कोरोनामुळे लॉकडाउन स्थितीत अनेक कंपन्यांनी परप्रांतीय मजुरांना वाऱ्यावर सोडले. मात्र, उद्योजक कदम यांनी कामगारांना आधार दिला.

राजपथ इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीत तेराशेपैकी सहाशे कामगार परप्रांतीय आहेत. कंपनीच्या तळावर सर्व कामगारांना चहा-नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था कदम यांनी मोफत केली. लॉकडाउन संपेपर्यंत कामगारांना काम न करता शंभर टक्के वेतन दिले जाणार आहे. "सकाळ'शी बोलताना उद्योजक कदम म्हणाले, ""कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीत सामाजिक बांधिलकीतून खारीचा वाटा उचलला आहे.'' 

देवळाली प्रवरासाठी पाच लाखांची मदत 
उद्योजक कदम यांनी जन्मभूमी असलेल्या देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील, हातावर पोट असलेल्या गरजू नागरिकांना अन्नदानासाठी पुढाकार घेतला. देवळाली प्रवरा पालिकेतर्फे सुरू केलेल्या अन्नछत्रासाठी त्यांनी राजश्री कदम प्रतिष्ठानातर्फे जीवनावश्‍यक वस्तूंच्या स्वरूपात पाच लाख रुपयांची मदत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे सुपूर्द केली.

यापूर्वी, त्यांनी देवळाली प्रवरा येथील ओढे-नाले रुंदीकरणासाठी 40 लाख रुपयांच्या पोकलेन मशिनचे लोकार्पण केले आहे. गेल्या वर्षी सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला होता. महापुराची सर्वाधिक झळ बसलेल्या शिरोळ तालुक्‍यात उद्योजक कदम यांनी तेराशे गॅस शेगड्यांचे वाटप केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT