Karnataka Government Almatti Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam : कोल्हापुरातील 'हे' बंधारे गेले पाण्याखाली; 'हिप्परगी'चे 22 पैकी 16 दरवाजे केले बंद; 'आलमट्टी'ची काय आहे स्थिती?

आलमट्टी धरणाची (Almatti Dam) पाणीपातळी ५१७ मीटरपेक्षा जादा ठेवू नये, अशी मागणी समितीने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली.

सकाळ डिजिटल टीम

पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बंधारे पाण्याखाली ही परिस्थिती ३० जूनलाच उद्‌भवली आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचे अनुमान आहे.

कोल्हापूर : हिप्परगी बॅरेजचे २२ पैकी १६ दरवाजे बंद केले आहेत. येथे येणारा विसर्ग हा २१००० क्युसेक्स इतका आहे. येथील उघडलेल्या सहा दरवाजातून १२००० क्युसेक्स पाणी प्रवाहित होत आहे. येथील पाण्याच्या फुगीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर व तेरवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे वाहून आलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने विसर्ग न झाल्याने राजाराम बंधाराही (Rajaram Bandhara) पाण्याखाली गेला आहे. याला कोल्हापूर पाटबंधारे विभाग (Kolhapur Irrigation Department) जबाबदार आहे, असा आरोप आज कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने (सांगली)ने केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

तसेच, ३१ ऑगस्टपर्यंत हिप्परगीचे (Hipparg Dam) सर्व दरवाजे खुले ठेवावेत व आलमट्टी धरणाची (Almatti Dam) पाणीपातळी ५१७ मीटरपेक्षा जादा ठेवू नये, अशी मागणी समितीने आज निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठविले. निवेदनात म्हटले आहे की, कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत ७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ३१ ऑगस्टपर्यंत हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवून विसर्ग खाली सोडण्यावर चर्चा झाली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्य करत कार्यवाहीबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बंधारे पाण्याखाली ही परिस्थिती ३० जूनलाच उद्‌भवली आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचे अनुमान आहे. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT