Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतला पूर उठला जीवावर; बोट उलटून 16 जण बुडाले

सकाळ वृत्तसेवा

सांगली : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा-कोयना नद्यांच्या महापुराने सांगलीत हाहाकार उडविला असून, आज (बुधवार) हा पूर तब्बल 16 जणांच्या जीवावर उठला. सांगलीजवळील ब्रह्मनाळ येथे बचावकार्य करताना बोट उलटल्याने 16 जण वाहून गेले. यातील 9 जणांचे मृतदेह सापडले असून, 7 जण बेपत्ता आहेत. 

सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रह्मनाळ गावातून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून 16 जण वाहून गेले आहेत. सांगलीतील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात महापूर आला आहे. पुरात अडकलेल्या 30 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. ब्रम्हनाळपासून खटावकडे या नागरिकांना नेण्यात येत होते. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट उलटली आणि नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात हे सर्वजण बुडाल्याची शक्यता आहे. 16 जण बेपत्ता असून, यातील 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अन्य सात जणांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे. सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून या भागात बचावकार्य राबविण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT