NCP.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनी येथे केले 196 कार्यकर्त्यांनी रक्तदान 

सकाळवृत्तसेवा

सांगली, ः राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीत घेतलेल्या रक्तदान शिबीरात 196 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर रक्ताची टंचाई लक्षात घेवून पक्षाने हा उपक्रम राज्यभर राबवलेला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला तरुण कार्यकर्त्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात शिबिर झालेय सकाळपासूनच रक्तदानासाठी गर्दी होती. श्री. बजाज यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 
प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साध्या पद्धतीने आणि रक्तदान शिबिर घेण्यात यावे, असे आवाहन केले होते. मिरज सर्जिकल इन्स्टिट्यूट ब्लड बॅंक सांगली यांनी रक्तदान शिबिर साठी सर्व स्टाफचे सहकार्य लाभले. रक्तदात्याचे श्री बजाज यांनी कौतुक केले. ते म्हणाले, यापुढे तालुका पातळीवर शिबिरातून साडेतीन हजारहून अधिक बाटल्या रक्त जमा होईल. कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढाईत रक्तदान महत्त्वाच्या उपक्रमाला खूप मोठी साथ दिली. 

यावेळी मैनुद्दीन बागवान, पद्माकर जगदाळे, आयुब बरगिर, राहुल पवार, संगीता हारगे, दिग्विजय सूर्यवंशी, योगेंद्र थोरात, अभिजित हारगे, संजय तोडकर, मालन हुलवान, छाया जाधव, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, वैशाली कळपे, आयेशा शेख, राधिका हारगे, ज्योती आदाटे, निलेश पवार, अशोक मोहिते आदी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT