2 cartridges seized in Ashta along with Gavathi pistol 
पश्चिम महाराष्ट्र

गावठी पिस्तुलासह आष्ट्यात २ काडतुसे जप्त

‘एलसीबी’ची कारवाई; घुणकीच्या एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

आष्टा - आष्टा-बागणी मार्गावरील एका हॉटेलसमोर गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणास पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. विशाल आनंदा शिंदे (वय २९, घुणकी, ता. हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी, की अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील पोलिस आष्टा येथे गस्तीवर होते. यावेळी पथकातील अंमलदार ऋषिकेश सदामते यांना माहिती मिळाली. आष्टा ते बागणी रोडवर असलेल्या हॉटेल जायंट्स हॉलच्या समोर एक तरुण पिशवीतून पिस्तूल घेऊन ते विक्रीसाठी आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक विशाळ येळेकर यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा मारून विशाल शिंदे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांची झडती घेतली असता पिशवीत एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असे मिळून आले. गावठी कट्टा व जिवंत काडतुसांबाबत विचारणा केली असता ती विक्रीकरिता आणल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी त्याच्याजवळील एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे जप्त करून संशयित व मुद्देमाल आष्टा पोलिस ठाण्यास सुपूर्द करण्यात आला आहे. कारवाईत उपनिरीक्षक येळेकर, मेघराज रुपनर, मच्छिंद्र बर्डे, राहुल जाधव, दीपक गट्टे यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT