corona 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात आणखी 20 रुग्णांना कोरोना; सांगली शहरात सहा 

अजित झळके

सांगली ः जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर वेगाने धावत असून शुक्रवारी आणखी वीस रुग्णांची भर पडली आहे. त्यात सांगली शहरातील तब्बल सहा रुग्णांचा समावेश असून पलूस तालुक्‍यातील दुधोंडी या एका गावात आणखी सहा रुग्ण सापडले आहेत. 
त्यामुळे जिल्हाभर भितीचे वातावरण पुन्हा तयार झाले आहे. सांगली शहरातील अरिहंत कॉलनीतील चारजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मिरज तालुक्‍यातील शिंदेवाडी येथील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाळवा येथे एका बाधिताच्या कुटुंबातील चौघांना बाधा झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील नागज येथील एकजण बाधित सापडला आहे. तो मुंबईहून आला असून पोलिस दलात असल्याची माहिती आहे. शिराळ्यातील येळापूर येथील एकाला बाधा झाली आहे. 


सांगली शहराला धक्का देणारी बातमी आज दुपारी समोर आली. या शहरात बेघरांचे घर म्हणून स्थापन करण्यात आलेल्या सावली निवारा केंद्रातील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. आपटा पोलिस चौकीजवळ असलेल्या या केंद्रात सत्तरहून अधिक लोक राहतात आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी दहाहून अधिक लोकांची टीम तेथे काम करते. महापालिका, सामाजिक संस्था आणि देणगीदारांच्या मदतीतून चालणाऱ्या या केंद्राच्या संपर्कात अनेक लोक असल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे. 


सावली निवारा केंद्रातील संशयित रुग्ण तीन दिवसांपूर्वी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्यातून त्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने तत्काळ तिथे धाव घेत हा भाग सीलबंद केला आहे. या केंद्रात काम करणाऱ्यांसह सर्व आश्रितांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT