22 new patients in Tasgaon taluka; Vaccination stopped
22 new patients in Tasgaon taluka; Vaccination stopped 
पश्चिम महाराष्ट्र

तासगाव तालुक्‍यात नवे 22 रुग्ण; लसीकरण थांबले 

रवींद्र माने

तासगाव : तासगाव तालुक्‍यात कोरोनाची दहशत वाढत असून आज नवे 22 रुग्ण सापडले, 1 एप्रिलपासून आठ दिवसांत 142 कोरोना रुग्ण सापडल्याने तालुका हादरला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज तालुक्‍यात कोरोना लसींचा तुटवडा झाल्याने एकही लसीकरण झाले नाही. 

तासगाव शहरात आज कोरोनाने आणखी नवे चार रुग्ण मिळून आले. तासगाव शहरात दररोज कोरोना रुग्ण सापडत आहेत. आज शहरात 4 नवे कोरोना रुग्ण सापडले, तर 1 एप्रिलपासून तासगावात 28 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तासगाव शहरात कोरोना पुन्हा एकदा पाय पसरताना दिसत आहे. एकीकडे कोरोना वाढत असताना शहरातील गर्दी मात्र कमी होताना दिसत नाही. होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण निवांत बाजारहाट करताना दिसत आहेत. 

ग्रामीण भागातील आरवडे, बलगवडे, दहिवडी, धुळगाव खूजगाव, विसापूर यमगरवाडी, येळावी येथे प्रत्येकी 1 तर हातनूर वासुंबे नागाव कवठे येथे प्रत्येकी 2, तर जरंडी येथे चार कोरोना रुग्ण असे तालुक्‍यात आज 22 रुग्ण आढळून आले. 1 एप्रिलपासून गेल्या आठ दिवसांत 142 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत हे सर्वांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत असून प्रतिबंधात्मक उपाय योजना होताना मात्र दिसत नाहीत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT