CORONA.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात नवे 231 रूग्ण ...335 कोरोनामुक्त...10 जणांचा मृत्यू : 472 चिंताजनक रूग्ण 

घनश्‍याम नवाथे

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात झालेल्या कोरोना चाचणीमध्ये 231 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 47 रूग्ण असून ग्रामीण भागात वाळवा व खानापूर तालुक्‍यात सर्वाधिक 36 रूग्ण आहेत. दिवसभरात जिल्ह्यातील 10 रूग्णांचा आणि सातारा येथील एकाचा मृत्यू झाला. तर आज 335 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीमध्ये 667 रूग्णांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 105 जण बाधित आढळले. हे प्रमाण 16 टक्के इतके आहे. तर ऍन्टीजेन चाचणीमध्ये 1852 रूग्णांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 131 रूग्ण बाधित आढळले. हे प्रमाण 8 टक्के इतके आहे. दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमध्ये 236 रूग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 231 जिल्ह्यातील आणि 5 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. आजच्या 231 रूग्णांमध्ये आटपाडी तालुक्‍यातील 11, जत 17, कडेगाव 16, कवठेमहांकाळ 8, खानापूर 36, मिरज 16, पलूस 10, शिराळा 19, तासगाव 15, वाळवा 36 आणि महापालिका क्षेत्रातील 47 रूग्णांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील रूग्णांमध्ये सांगलीतील 33 आणि मिरजेतील 14 रूग्णांचा समावेश आहे. 

आज दिवसभरात दहा रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तासगाव तालुक्‍यातील तीन, पलूस व वाळवा तालुक्‍यातील प्रत्येक दोन आणि जत, कडेगाव, महापालिका क्षेत्रातील एक रूग्ण यांचा समावेश आहे. तसेच सातारा येथील एका रूग्णाचा येथे मृत्यू झाला. आज दिवसभरात 335 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 
सद्यस्थितीत 3474 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2529 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी 472 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 400 रूग्ण ऑक्‍सिजनवर आणि 72 रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे बाधित रूग्ण- 42472 
  • आजअखेर कोरोनामुक्त- 37438 
  • सध्या उपचार घेणारे रूग्ण- 3474 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1560 
  • परजिल्ह्यातील मृत रूग्ण- 201 
  • सद्यस्थितीत चिंताजनक रूग्ण- 472 
  • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 20547 
  • आजअखेर शहरी रूग्ण- 6238 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण- 15687 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT